Maval Loksabha Constituency : मावळला महायुतीचे नाराजीनाट्य ; आठवले गट बैठकीतून बाहेर,सामंत यांची मध्यस्थी अपयशी

महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी महायुतीच्या काळेवाडी येथील बैठकीत सोमवारी (ता. ८) नाराजीनाट्य घडले.
Maval Loksabha Constituency
Maval Loksabha Constituency sakal
Updated on

पिंपरी : महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी महायुतीच्या काळेवाडी येथील बैठकीत सोमवारी (ता. ८) नाराजीनाट्य घडले. भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या (आरपीआय) आठवले गटाच्या शहराध्यक्षांना व्यासपीठावर न बोलावल्याने आणि त्यांचा नामोल्लेख न केल्याने या गटाचे पदाधिकारी बैठकीतून बाहेर पडले. आठवले यांचा आदेश आल्याशिवाय बारणे यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका या पदाधिकाऱ्यांनी घेतली.

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. परंतु सुरवातीलाच आठवले गटाचे शहराध्यक्ष स्वप्नील कांबळे यांनी स्पष्ट केले की, ‘आठवले यांना योग्य मानसन्मान मिळत नाही. भाषणात त्यांचा उल्लेख केला जात नाही. स्थानिक पदाधिकाऱ्यांना प्रचारासाठी विश्‍वासात घेतले जात नाही.’

Maval Loksabha Constituency
Loksabha Election 2024 : गड, किल्ले, पर्यावरण संवर्धन, विकास ठरतोय प्रचाराचा मुद्दा

दरम्यान, कांबळे यांचा नामोल्लेख आणि व्यासपीठावर बसण्यासाठी त्यांना बोलावण्यात न आल्याने या गटाचे पदाधिकारी बैठकीतून बाहेर जाऊ लागले. शेजारून जाणाऱ्या सामंत यांच्या हे लक्षात आले. त्यांनी बारणे यांच्याशी शहराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची भेट घडवून नाराजीनाट्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या प्रयत्नांना अपयश आले. याबाबत बारणे म्हणाले, ‘शहराध्यक्ष कोण आहे आणि कोण नाही हा आरपीआयचा अंतर्गत वाद आहे. याबाबत आठवले बोलतील. प्रचाराशी त्याचा संबंध नाही.’

अजित पवार यांच्यावर ‘अशीही’ वेळ

मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांचा बारणे यांनी दोन लाख १५ हजार ९१३ मतांनी पराभव केला होता. हा पराभव तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला होता. नंतर अलीकडेच बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे अजित पवार महायुतीत गेले व त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. आता त्यांच्यावर बारणे यांचाच प्रचार करण्याची वेळ आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. अजित पवार आता महायुतीतील घटक पक्षाचे मुख्य नेते आहेत. त्यामुळे पार्थ पवार यांनी माझ्या प्रचाराला यावे.

— श्रीरंग बारणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.