उदयनराजेंविरोधात शरद पवारांनी बाहेर काढला हुकमी एक्का; संघर्ष योद्ध्यालाच रिंगणात उतरविण्याचा घेतला निर्णय

शरद पवारांनी चार इच्छुकांपैकी आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव निश्चित केल्याचे सांगितले जात आहे.
Udayanraje Bhosale vs Shashikant Shinde
Udayanraje Bhosale vs Shashikant Shindeesakal
Updated on
Summary

येत्या एक- दोन दिवसांत याबाबतची घोषणा खासदार शरद पवार हे महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीनंतर करणार आहेत.

सातारा : सातारा लोकसभा (Satara Lok Sabha) मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराची अद्याप घोषणा झाली नसली, तरी श्री. पवार यांनी आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) या संघर्ष योद्ध्यालाच रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा येत्या एक- दोन दिवसांत होणार आहे.

महायुतीकडूनही उमेदवाराची घोषणा करण्यात आली नसली, तरी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची उमेदवारी जवळपास निश्‍चित मानली जात आहे. त्यामुळे उदयनराजे विरोधात शशिकांत शिंदे असा सामना रंगणार आहे. येत्या १५ एप्रिलला खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत श्री. शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे.

Udayanraje Bhosale vs Shashikant Shinde
Kolhapur Lok Sabha : डॉ. बाबासाहेब आंबेडकर भेटले अन् डिगे कोल्हापूरचे खासदार झाले, हत्तीवरून काढली मिरवणूक

या वेळी महाविकास आघाडीतील घटक पक्ष व विविध संघटनांचे शक्तिप्रदर्शन होणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित मानली जात आहे. मात्र, त्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा महायुतीकडून झालेली नाही, तरीही महायुतीकडून विधानसभा मतदारसंघनिहाय मेळावे सुरू झाले आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतून यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे महायुतीच्या विरोधात तुल्यबळ व तगडा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू होत्या.

Udayanraje Bhosale vs Shashikant Shinde
'सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत नक्कीच चांगली बातमी येईल'; विशाल पाटलांचं सेनेला बुचकळ्यात टाकणारं वक्तव्य

त्यासाठी चार इच्छुकांसह काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव ही आघाडीवर होते. मात्र, अनेक बैठका, चर्चांनंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी तुतारी चिन्हावर लढण्यास नकार दिला. त्यामुळे पवारांनी आपल्याच पक्षातील नेत्याला संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शरद पवारांनी चार इच्छुकांपैकी आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव निश्चित केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे साताऱ्यात उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे असा थेट सामना होणार आहे.

येत्या एक- दोन दिवसांत याबाबतची घोषणा खासदार शरद पवार हे महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीनंतर करणार आहेत. नुकतीच आमदार शिंदेंनी खासदार शरद पवार यांची भेट घेऊन ‘कोण लढणार आहेत का बघा, नाही तर मी आहेच’ असे सांगून टाकले होते. त्यानुसार खासदार शरद पवार यांनी आपला हुकमी एक्का शशिकांत शिंदे यांचे नाव निश्चित केले आहे. येत्या सोमवारी श्री. शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. त्यासाठी खुद्द खासदार शरद पवार साताऱ्यात येणार आहेत.

Udayanraje Bhosale vs Shashikant Shinde
बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी शिवसेना स्थापन केली, त्यांचेच पुत्र आज हिंदुत्व संपवून टाकताहेत; राणेंचा ठाकरेंवर हल्ला

त्या वेळी राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस यासह महाविकास आघाडीतील घटक पक्ष व विविध संघटनांतर्फे शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र भैय्या पाटील तसेच श्रीराम पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. माढामधून धैर्यशील मोहिते पाटील, अनिकेत देशमुख यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.