Mamata Banerjee: ममतांनी सांगितलं NDA अन् INDIAला किती जागा मिळणार; म्हणाल्या, कालच...

पश्चिम बंगालमधून केंद्रासाठी आपणच जिंकवणार आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे.
Mamata Banerjee
ममता बॅनर्जीesakal
Updated on

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात भाजप्रणित एनडीए आणि इंडिया आघाडी यांना किती जागा मिळतील याचं भाकीत केलं आहे. यासाठी आमच्याकडं याचा हिशोब असल्याचं त्यांनी एका जाहीर सभेत बोलताना सांगितलं. (Mamata Banerjee prediction how many seats NDA and INDIA will get said yesterday we have count)

पश्चिम बंगालमधील उत्तर परगाना जिल्ह्यातील बनगाव इथं एका प्रचार सभेत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, दीदी केंद्रात इंडिया आघाडीला सत्तेत आणणार आहे. आम्ही पश्चिम बंगालमधून त्यासाठी मदत करणार आहोत. आपल्या सर्वांना मिळून इंडिया आघाडीला जिंकवायचं आहे. कालपर्यंत आमच्याकडं जो हिशोब आला आहे त्यानुसार, भाजपला १९०-१९५ जागा तर इंडिया आघाडीला आत्तापर्यंत ३१५ जागा मिळणार आहेत. त्यामुळं आता मोदी येणार नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.