MVA Seats Sharing: मुंबईतल्या 6 जागांवरुन मविआत धुसफूस; काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीनंही केला 'इतक्या' जागांवर दावा

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबईतल्या सहा पैकी चार जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.
Nana Patole
Nana PatoleEsakal
Updated on

नवी दिल्ली : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबईतल्या सहा पैकी चार जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. पण आता यातील काही जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं देखील दावा दाखल केला आहे. काल काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी अमोल किर्तीकर यांच्या उमेदवारीवरुन शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता तर आज राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांनी ईशान्य मुंबईची जागा आमच्या हक्काची असल्याचं म्हटलं आहे.

त्यामुळं मुंबईतच्या जागांवरुन महाविकास आघाडीत धुसफूस सुरु असल्यीच चर्चा सुरु झाली आहे. (MVA Seats Sharing tangle in Mumbai after congress now NCP also claimed seats)

Nana Patole
Arvind Kejriwal: दिलासा नाहीच! अरविंद केजरीवाल यांची ईडी कोठडी १ एप्रिलपर्यंत वाढवली

शिवसेनेनं मुंबईत किती जागांवर दिले उमेदवार?

ठाकरेंच्या शिवसेनेनं २७ मार्च रोजी मुंबईतील चार जागांवर आपले उमेदवार जाहीर केले. यामध्ये मुंबई दक्षिण-मध्यमधून अनिल देसाई, मुंबई ईशान्यमधून संजय दिना पाटील, मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत तर मुंबई वायव्यमधून अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. (Latest Marathi News)

काँग्रेसचा आक्षेप काय?

शिवसेनेनं मुंबई वायव्यमधून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. पण या जागेवर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी आक्षेप घेतला असून ही काँग्रेसची जागा असल्याचा दावा केला आहे.

शिवसेनेनं सहापैकी चार जागांवर उमेदवार जाहीर करुन काँग्रेसच्या तोंडाला पानं पुसली असल्याचं म्हटलं आहे. तसेच मुंबई महापालिकेतील कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळ्यात नाव आलेल्या अमोल किर्तीकर यांना खिचडी चोर असं संबोधत त्यांच्यासाठी आम्ही काम करणार नाही, असंही निरुपम यांनी म्हटलं होतं. (Marathi Tajya Batmya)

राष्ट्रवादीचा आक्षेप काय?

राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या विद्या चव्हाण यांनी देखील शिवसेनेच्या जागा वाटपावर आक्षेप घेतला असून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी मिळून मुंबईतल्या उमेदवारांची घोषणा करायला हवी होती, असं त्यांनी म्हटलं आहे. पण शिवसेनेत संयम कमी असल्यानं त्यांनी लगेच आपले उमेदवार जाहीर करुन टाकले ही कदाचित शिवसेनेची स्टाईल असेल. पण अद्याप या उमेदवारांनी अर्ज भरलेले नाहीत. त्यामुळं ईशान्य मुंबईची जागा ही आमच्या हक्काची जागा आहे. या ठिकाणावरुन संजय दिना पाटील हे राष्ट्रवादीचे खासदार निवडून आले होते. पण आता ते जरी शिवसेनेत गेले असले तरी ही आमची जागा असून पाटील यांनी दुसऱ्या जागेचा पर्याय शोधावा असा सल्लाही चव्हाण यांनी दिला आहे.

जर शिवसेनेला ईशान्य मुंबईची जागा द्यायची नसेल तर मध्य मुंबई आम्हाला द्यावी इथून आमचे निलेश भोसले आणि राखी जाधव हे उमेदवार लढण्यास इच्छुक आहेत. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना इतकं नाराज करु शकत नाही. जर महाविकास आघाडी एकजुटीनं लढतेय तर कार्यकर्त्यांमध्ये खुशी असायला हवी, जोरजबरदस्ती व्हायला नको. दरम्यान, येत्या त्या २४ तासांत आमचे उमेदवार जाहीर होतील, असंही विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.