Vikas Thakre Nagpur: भाजपच्या हुकमी एक्क्यासमोर काँग्रेसनं रिंगणात उतरवलेले विकास ठाकरे कोण?

Nagpur Lok Sabha: नागपूर लोकसभा मतदारसंघ... विदर्भातला असा मतदारसंघ जो गडकरींआधी एक अपवाद वगळता कायम काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. पण आता या मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे.
Vikas Thakre Nagpur
Vikas Thakre Nagpuresakal
Updated on

Nagpur Lok Sabha: नागपूर लोकसभा मतदारसंघ... विदर्भातला असा मतदारसंघ जो गडकरींआधी एक अपवाद वगळता कायम काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. पण आता या मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. कारण लोकप्रिय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याच लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आणि गडकरीच आहेत ज्यांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावलाय. त्यामुळे आता गडकरींविरुद्ध काँग्रेसनं यंदा विकास ठाकरेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं.

तरी, गडकरींसारख्या मातब्बरापुढे, लोकप्रिय मंत्र्यासमोर विकास ठाकरेंचा टिकाव लागणार का? हे पाहणं महत्वाचं आहे. तरी, भाजपच्या हुकमी एक्क्यासमोर म्हणजेच गडकरींसमोर काँग्रेसनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले विकास ठाकरे कोण? आणि नागपूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा जाणून घेऊयात-

काँग्रेसचे विकास ठाकरे विरुद्ध केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असा सामना येत्या लोकसभा निवडणुकीत नागपूर लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. गडकरींबद्दल सर्वांनाच माहिती आहे. ते सध्या मोदी सरकारमधले असे लोकप्रिय मंत्री आहेत, ज्यांच्या कामामुळे विरोधकही त्यांची स्तुतीच करताना दिसतात. आता येऊयात गडकरींना दोन हात देणाऱ्या विकास ठाकरेंकडे. विकास ठाकरेंबद्दल सांगायचं झालं तर...

विकास ठाकरे कोण आहेत?

• नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष
• नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार
• नागपूरचे माजी महापौर
• नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचे विश्वस्त होते
• २००९ साली फडणवीसांविरुद्ध लढले, पराभूत झाले
• २०१४ साली सुधाकर देशमुखांविरुद्ध लढले पराभूत झाले
• २०१९ साली देशमुखांविरुद्ध लढले आणि त्यांचा पराभव करुन तिसऱ्यांदा आमदार झाले

विकास ठाकरेंचा दांडगा जनसंपर्क आहे. विकास ठाकरेंच्या उमेदवारीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंपासून सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांचा पाठिंबा आहे. वरिष्ठांपासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सहज संपर्क असलेला नेता म्हणजे विकास ठाकरेंची ओळख नागपुरात आहे. विकास ठाकरे खरंतर कुणबी समाजातून येतात. नागपूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या आकडेवारीबाबत सांगायचं झालं तर, सर्वाधिक मतदार कुणबी समाजाचेच आहेत २०१९ साली नाना पटोले जेव्हा गडकरींविरुद्ध रिंगणात होते, तरी त्यावेळी त्यांनी साडेचार लाख मतं घेतली होती. तर, २०१४ साली विलास मुत्तेमवार यांना ३ लाख मतं मिळाली होती. त्यामुळे नागपुरात काँग्रेसची तीन ते साडेतीन लाख मतांची वोटबँक आहेच.

‘वंचित’ ठाकरेंच्या पाठीशी-

याशिवाय मुस्लिम, दलित आणि कोष्टी किंवा हलबा समाज हा सुद्धा एक मतदारवर्ग आहे. या मतदाराचा सध्या भाजपवर प्रचंड रोष असल्याची चर्चा आहे. त्यामुळे याचाही फायदा येत्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना होईल अशी चर्चा आहे. आणखी एक महत्वाचा फॅक्टर म्हणजे वंचित. प्रकाश आंबेडकरांनी २७ मार्चला ८ उमेदवारांच्या नावांची घोषणा करतानाच नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंना पाठिंबा देणार असल्याचे म्हटलंय.

२०१९ साली वंचितच्या उमेदवारानं जवळपास २६ हजार मतं घेतली होती. पण यंदा काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे दलित, मुस्लिम समाजाकडून वंचितला होणाऱ्या मतांचं विभाजन टळेल अन् तेही ठाकरेंनाच मिळेल अशी शक्यता आहे. याशिवाय बसपाचा उमेदवारही ३०-३५ हजाराच्या आसपास मतदान घेतो. पण, यंदाचा उमेदवार किरकोळ असल्याची चर्चा नागपूरच्या राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे त्याचा फायदाही ठाकरेंना होणार असल्याचं बोललं जातंय.

Vikas Thakre Nagpur
Arvind Kejriwal: दिलासा नाहीच! अरविंद केजरीवाल यांची ईडी कोठडी १ एप्रिलपर्यंत वाढवली

खरंतर, नागपूर हा मेट्रोपॉलिटन लोकसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघावर कायम काँग्रेसचं वर्चस्व राहिलं आहे. गडकरींआधी १९९६ साली सुद्धा बनवरीलाल पुरोहित हे भाजपाकडून लोकसभेवर निवडून गेले तर तेही पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते होते. त्यानंतर १९९८ पासून २०१४ पर्यंत विलास मुत्तेमवार हे काँग्रेसकडून सलग चारवेळा खासदार म्हणून निवडून गेलेत. त्यानंतर २०१४ साली गडकरींनी लोकसभा निवडणुकीत बाजी मारली अन् काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. खरंतर विकास ठाकरेंबाबत आणखी एक गोष्ट सांगितली जाते की, ते विलास मुत्तेमवार, नाना पटोलेंच्या तुलनेत जास्त ताकदवर काँग्रेस नेते आहेत.

तर, येत्या लोकसभा निवडणुकीत ५ लाखांच्या मताधिक्यानं जिंकण्याचा गडकरींना विश्वास आहे. पण ते वास्तवात उतरण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचं स्थानिक राजकीय विश्लेषकांचे म्हणणं आहे. त्यामुळे आता येत्या लोकसभा निवडणुकीत विकास ठाकरे गडकरींना किती टफ फाईट देतात हे पाहणं महत्वाचं असेल.

Vikas Thakre Nagpur
MVA Seats Sharing: मुंबईतल्या 6 जागांवरुन मविआत धुसफूस; काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीनंही केला 'इतक्या' जागांवर दावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.