Vote From Home: दिव्यांग अन् ८५ वर्षांवरील नागरिकांसाठी 'वोट फ्रॉम होम', भरावा लागणार हा फॉर्म; आयोगाने केली व्यवस्था

केंद्रीय निवडणूक आयोग मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी विविध उपाययोजना राबवून जनजागृती करण्यात येत आहे.
Nagpur
Nagpur Esakal
Updated on

Vote From Home for Old Age and handicapped: केंद्रीय निवडणूक आयोग मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी विविध उपाययोजना राबवून जनजागृती करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे ४० टक्क्यांपेक्षा आधिक दिव्यांग व ८५ वर्षांवरील मतदारांना घरीच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु यासाठी त्यांना नमुना १२ ड भरून द्यावा लागेल.

वयस्क मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी अडचण येते. त्यांची सुविधा न केल्यास ते मतदानाला जात नाही, असे साधारणतः प्रशासनाच्या लक्षात आले आहे. प्रशासनाकडून दिव्यांग मतदारांना केंद्रपर्यंत ने-आण करण्याची सोय करण्यात येते. परंतु त्याचाही फायदा अनेकजण घेण्यात नाही.

त्यामुळे या दोन्ही वर्गाच्या मतदानाचा टक्का कमी असतो. त्यामुळे यंदा दिव्यांग व ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मतदारांसाठी घरीच मतपत्रिकांद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मतदारांना नमुना १२ ड भरून द्यायचा आहे. यासाठी बीएलओही संबंधित मतदरांच्या घरी येणार आहे. २४ मार्चपर्यंत त्यांना अर्ज भरून द्यायचा आहे. (Latest Marathi News)

हिंगणा मतदारसंघात असलेल्या ८५ वर्षावरील ३ हजार २५९ मतदारांना तसेच १ हजार ५७५ दिव्यांग मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे घरपोच मतदान करण्यासाठी नमुना १२ ड अर्ज वाटपाची मोहीम मतदार संघामार्फत सुरू करण्यात आली आहे.

Nagpur
Arvind Kejriwal: केजरीवालांचा तुरुंगातून संदेश! पत्नीनं वाचून दाखवला, म्हणाले, आपल्याला सतर्क...

यामध्ये पात्र असलेल्या मतदारांना नमुना १२ ड वाटपाचे अर्ज घरपोच उपलब्ध करून देणे बीएलओमार्फत सुरू आहे. ८५ वर्षावरील ज्या घरात वयस्क आहेत, अशा कुटुंबातील व्यक्तींनी आणि वयस्क मतदारांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.(Latest Marathi News)

Nagpur
Anurag Kashyap: "मला भेटायचं असेल तर 15 मिनिटांसाठी एक लाख आणि एक तासासाठी..."; अनुराग कश्यपच्या पोस्टनं वेधलं लक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.