Nashik Lok Sabha Election : बालेकिल्ला म्हणणाऱ्या मनसेच्या जनाधाराला ओहोटी; मतांचा टक्का घटला

Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेकडून नाशिकच्या जागेची मागणी जोर धरू लागली आहे.
mns
mnsesakal
Updated on

Nashik Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेकडून नाशिकच्या जागेची मागणी जोर धरू लागली आहे. जागेची मागणी करताना बालेकिल्ला असल्याचा दावा केला जात आहे. परंतू मनसेच्या कथित बालेकिल्ल्यात मतांचा टक्का वर्षागणिक घटल्याचे निवडणुकीत झालेल्या मतदानातून दिसून येत आहे. सन २००६ मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वत:चा पक्ष काढला. (nashik Polling in elections shows that percentage of votes in alleged stronghold of MNS has decreased marathi news)

मनसेला नाशिकमध्ये चांगला मतदारवर्ग लाभला. आश्‍वासनांच्या हिंदोळ्यावर गटांगळ्या खाणाऱ्या मनसेच्या माध्यमातून नाशिकच्या प्रगतीचा आलेख आश्‍वासित दिशेने दौड करेल असे मानणारा मोठा वर्ग होता. त्यामुळेच सन २००७ च्या महापालिका निवडणुकीत तब्बल बारा नगरसेवक तर सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत तीन आमदार शहरातून निवडून देण्यात आले. सन २०१२ च्या निवडणुकीत महापालिकेत मनसेचे चाळीस नगरसेवक निवडून आले.

महापालिका व विधानसभेबरोबरच लोकसभेच्या दोन निवडणूका मनसेने नाशिकमधून लढविल्या. परंतू प्रत्येक निवडणुकीच्या मतांची टक्केवारी लक्षात घेतली तर ती कमी होताना दिसत आहे. त्यामुळे मनसेचा बालेकिल्ला असे म्हणत लोकसभेवर सुरु झालेली दावेदारी फारशी टिकत नाही. सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत तीन आमदार निवडून दिले. त्यानंतर सन २०१४ च्या निवडणुकीत एकही आमदार निवडून आला नाही. (latest marathi news)

mns
Nashik Lok Sabha Election : ‘लहरी‘ मतदारसंघात दुभंगलेल्या शिवसेनेची कसोटी; भाजप एक तर बीएलडीचाही प्रभाव

लोकसभेत मात्र मतदान वाढले परंतू पहिला क्रमांक मिळविता आला नाही. सन २००९ मध्ये मनसेने प्रथम लोकसभेची निवडणुक लढविली. त्यात दुसऱ्या क्रमांकाची मते हेमंत गोडसे यांना मिळाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे समीर भुजबळ यांना २,३८, ७०६ तर गोडसे यांना २,१६,६७४ मते मिळाली. दुसऱ्या म्हणजे सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मनसेचे हेमंत गोडसे शिवसेनेकडून लढले.

त्यावेळी प्रथम क्रमांकाची ४ लाख ९४ हजार ७३५ मते गोडसे यांना मिळाली तर तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे छगन भुजबळ यांना ३ लाख ७ हजार ३९९ मते मिळाली. मनसेचे डॉ. प्रदीप पवार यांना ६३ हजार ५० मते मिळाल्याने मनसेचा जनाधार मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे महायुतीत मनसेला नाशिकची जागा मिळाली तरी जनाधार वाढविण्याचे मोठे आव्हान राहील. भाजप व शिंदे सेनेच्या भरवशावरच मनसेचे इंजिन नाशिकमधून धावणार आहे.

लोकसभा निवडणुकीत मनसेचे मतदान

- सन २००९ हेमंत गोडसे २,१६,६७४

- सन २०१४ डॉ. प्रदीप पवार ६३,०५०

mns
Nashik Lok Sabha Election : मोदी लाटेने मोडली परंपरा..!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.