NCP Sharad Pawar : पवार गट हरियानात लढण्याच्या प्रयत्नात ; शरद पवार-खर्गे यांची भेट,कर्नालमध्ये वर्मा यांना उमेदवारी शक्य

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हरियानामधील कर्नाल मतदार संघ लढविण्याच्या प्रयत्नात आहे. हरियानातील नेते वीरेंद्र वर्मा हे या पक्षाचे अधिकृत उमेदवार असू शकतात.
NCP Sharad Pawar :
NCP Sharad Pawar :sakal
Updated on

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हरियानामधील कर्नाल मतदार संघ लढविण्याच्या प्रयत्नात आहे. हरियानातील नेते वीरेंद्र वर्मा हे या पक्षाचे अधिकृत उमेदवार असू शकतात. हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मिळावा, या प्रयत्नांचा भाग म्हणून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आज काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली.

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट आणि अजित पवार गटाची लढत राज्याबाहेर लक्षद्वीपमध्येही होणार आहे. शरद पवार गटाने लक्षद्वीपमधील मावळते खासदार महम्मद फैजल यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने टी. पी. युसूफ यांना मैदानात उतरविले आहे. त्यानंतर आता शरद पवार गटाने हरियानातून उमेदवार देण्याची तयारी चालविली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट झाली.

NCP Sharad Pawar :
BJP in America : भाजपमित्रांची अमेरिकेत वातावरणनिर्मिती

या भेटीमध्ये कर्नाल मतदार संघांवर चर्चा झाल्याचे समजते. रोड मराठा समाजाचे नेते असलेले वीरेंद्र वर्मा हे देखील यावेळी उपस्थित होते. अर्थात, हरियानातील जागेसोबतच महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून सुरू असलेली रस्सीखेच यावरही दोन्ही नेत्यांची बातचीत झाल्याचे कळते.

वंचित बहुजन आघाडीने त्यांचे उमेदवार जाहीर केल्याने लोकसभा निवडणुकीमधील संभाव्य हानी गृहीत धरून महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता आहे. त्यापार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांचा पारंपरिक मतदार संघ असलेल्या अकोल्यामध्ये काँग्रेसने उमेदवार न देता प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा द्यावा, असा प्रस्तावही काँग्रेससमोर मांडण्यात आला आहे. त्यासंदर्भातही पवार आणि खर्गे यांच्यात बातचीत झाल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.