नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत बहुमताचा आकडा पार पडल्यानंतर आता एनडीएकडून सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी निवड करण्यात आली. तसंच सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राष्ट्रपतींनी त्यांना ७ जूनची तारीख दिली आहे. (Narendra Modi choose as NDA leader President has given time for claim of establishment of power on June 7)
मोदींच्या नेतेपदाच्या निवडीच्या प्रस्तावात काय म्हटलं?
भारताच्या १४० कोटी देशवासियांनी गेल्या १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारच्या लोककल्याणकारी धोरणांमुळं देशाच्या प्रत्येक क्षेत्राला विकसित होताना पाहिलं आहे. बऱ्याच काळापासून सुमारे ६ दशकांनंतर भारताच्या जनतेनं सलग तिसऱ्यांदा पूर्ण बहुमतानं सशक्त नेतृत्वाची निवड केली आहे.
आपल्या सर्वांना गर्व आहे की, २०२४ची लोकसभा निवडणूक एनडीएनं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एकजुटीनं लढली आणि जिंकली. आम्ही सर्वजण एनडीएचे नेते नरेंद्र मोदी यांना सर्वसंमतीनं आमचा नेता म्हणून निवड करतो.
मोदींच्या नेतृत्वात एनडीए सरकार भारताच्या गरीब-महिला-तरुण-शेतकरी आणि शोषित, वंचित आणि पीडित नागरिकांच्या सेवेसाठी प्रतिबद्ध आहे. भारताचा वारसा संरक्षित करुन देशाच्या सर्वांगिण विकासासाठी एनडीए सरकार भारताच्या लोकांच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी काम करत राहिल. हा प्रस्ताव ५ जून २०२४ ला नवी दिल्लीत मंजूर झाला आहे.
एनडीएच्या बैठकीनंतर ७ जून रोजी एनडीएचे नेते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रपतींना त्यांना भेटीसाठी वेळ दिली आहे. यावेळी एनडीएचे प्रमुख नेते मिळून राष्ट्रपतींकडं सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे सर्वजण मिळून सत्तास्थापनेबाब चर्चा करणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.