Loksabha Election Result : टायगर अभी जिंदा है!

काय म्हणता पुणेकर, जिंकला की नाही मुरलीधर....’, ‘वॉशिंग मशिन बंद’, ‘वारं फिरतंय...’, ‘ते राज ठाकरे उठले का नाही अजून बघा जरा’, ‘ज्यांनी पैसे घेऊन मतदान दिलं नाय ते कसे बाहेर फिरतात. तेच बघतो’, ‘टायगर अभी जिंदा है’, अशा धुव्वाधार पोस्ट, मिम्स शेअर करत नेटीझन्सनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत रंगतदार प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
Loksabha Election Result
Loksabha Election Resultsakal
Updated on

पुणे : ‘काय म्हणता पुणेकर, जिंकला की नाही मुरलीधर....’, ‘वॉशिंग मशिन बंद’, ‘वारं फिरतंय...’, ‘ते राज ठाकरे उठले का नाही अजून बघा जरा’, ‘ज्यांनी पैसे घेऊन मतदान दिलं नाय ते कसे बाहेर फिरतात. तेच बघतो’, ‘टायगर अभी जिंदा है’, अशा धुव्वाधार पोस्ट, मिम्स शेअर करत नेटीझन्सनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत रंगतदार प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मंगळवारी (ता. ४) सकाळी साडेआठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली. तेव्हापासूनच नेटकरी व्यक्त होऊ लागले. जिल्ह्यात पुणे, मावळ, बारामती, शिरूर या चार लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांत काँटे की टक्कर झाली. निकाल जाहीर होताच पोस्टचा धुरळा उडाला.

तुतारी वाजलीच

राज्यासह देशाचे लक्ष वेधलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा पवार या नणंद-भावजय आमनेसामने आल्या. त्यामुळे बारामतीकर सुनेला निवडणार की लेकीला याची सर्वांनाच उत्सुकता होती. अन् निकाल जाहीर होताच नेटिझन्सनी ‘तुतारीच वाजली...’, ‘लेकीनं गड राखला...असे म्हणत सुप्रिया सुळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. दुसरीकडे ‘काका...काका...मला वाचवा’, ‘काकांची साथ सोडायला नको होती लेका...’ असे मिम्स व्हायरल होत होते. ‘साहेबांनी राजकारणात बोट धरून आणलं होतं, पण बाजार कसा उठवायचा हे नव्हतं शिकवलं’ असा टोला काही नेटिझन्सनी अजित पवार यांना लगावला.

नेटिझन्सच्या रंगतदार प्रतिक्रिया

पुण्यात वाजली भाजपचीच मुरली

पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे मुरलीधर मोहोळ व मविआचे रवींद्र धंगेकर यांच्यात लढत झाली होती. यामध्ये मोहोळ विजयी झाल्यावर ‘पुण्यात वाजली भाजपचीच मुरली...’, ‘पुण्याच्या पहिलवानाने गाठली दिल्ली’, ‘म्हणत होते पुणेकर, आपटणार धंगेकर’ अशा पोस्ट शेअर केल्या.

एक्झिट पोल चुकले तरी...

मंगळवारी मॉन्सूनने जोरदार हजेरी लावल्याने नेटिझन्सने निकालाला पावसाचा संदर्भ देत ‘एक्झिट पोलचे अंदाज चुकले असले, तरी... तरी वेधशाळेचा पावसाचा अंदाज तंतोतंत....’ अशाही पोस्ट व्हायरल झाल्या होत्या.

तो पत्ता करतो गुल...’

‘तो पत्ता करतो गुल...पाॅवरफुल!,’ ‘गर्वान फुगू नको अन् माझ्या नादाला लागू नको...’, ‘बाप तो बाप रहेगा’ अशी ठसकेबाज गाणी टाकून शरद पवार यांचे व्हिडिओ शेअर करत फेसबुक, इन्स्टा रिल्स व व्हॉट्स अप स्टेटसवर धुरळा उडवला.

शेअरचे मिम्स ट्रेंडिंगमध्ये

निर्विवाद बहुमतापासून भाजप पक्ष म्हणून बरेच दूर गेल्याने शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. नेटकऱ्यांनीही मजेदार मिम्स शेअर केले आहेत. ‘थोडा निचे, थोडा निचे बोलके कितना निचे आयेगा’, ‘पच्चीस दिन मे पैसा आधा’ असे संवाद असलेले चित्रपटातील व्हिडिओ नेटकऱ्यांनी शेअर केले.

‘सर्वांत सुखी ईव्हीएम बाई...’

निकालात एनडीए व इंडिया आघाडी यांच्यात कडवी चुरस सुरू होती. फरक जास्त नसल्यामुळे ईव्हीएमवर कोणीही आक्षेप घेत नव्हते. त्यामुळे ‘सर्वांत सुखी ईव्हीएम बाई..., कोणीच आक्षेप घेईना...’, ‘ईव्हीएम लय भारी’, अशा पोस्ट शेअर केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.