Nilesh Lanke : नीलेश लंके लोकसभेच्या रिंगणात ; जनतेची माफी मागत आमदारकीचा राजीनामा

‘‘एका बाजूला सत्ता व संपत्तीचा अहंकार, तर दुसऱ्या बाजूला जनशक्तीचा आवाज आहे. माझ्याकडे नोट नाही, पण व्होट आहे. राजकारण प्रतिष्ठा, पद आणि साम्राज्य टिकविण्यासाठी नाही, तर सामान्य जनतेची सेवा करण्यासाठी करत आहे.
Nilesh Lanke
Nilesh Lankesakal
Updated on

पारनेर : ‘‘एका बाजूला सत्ता व संपत्तीचा अहंकार, तर दुसऱ्या बाजूला जनशक्तीचा आवाज आहे. माझ्याकडे नोट नाही, पण व्होट आहे. राजकारण प्रतिष्ठा, पद आणि साम्राज्य टिकविण्यासाठी नाही, तर सामान्य जनतेची सेवा करण्यासाठी करत आहे. माझ्या कार्यकर्त्यांना डिवचले, त्यांच्या स्वाभिमानासाठी लोकसभा लढवत आहे. सर्व मतदारांची क्षमा मागून विधानसभा पदाचा राजीनामा देत आहे’’, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.

सुपे येथे लंके यांनी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता, त्यावेळी ते बोलत होते.

लंके म्हणाले, ‘‘जनतेने मला पाच वर्षांसाठी निवडून दिल होते. मात्र, मी सहा महिने आधीच राजीनामा देत आहे. हे जनतेसाठी करत आहे. पैसा कमविला नाही. मात्र, माझ्या जीवाभावाचे कार्यकर्ते कमविले. एका एसएमएसवर एवढे कार्यकर्ते जमा झालेत. महायुतीचे सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात छातीवर दगड ठेवून सहभागी झालो. त्यांच्या माध्यमातून मोठा निधी आणला. आता पुन्हा शरद पवारांकडे जात आहे.’’

तुमचा लेखाजोखा दाखवा

तालुक्यात मी आणलेली किंवा जिल्हा परिषदेची कामे मी केली, असे सांगत विखे कुटुंबीयांनी जनतेला फसविले. फक्त आश्‍वासने दिली. आम्ही दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करणारे नाहीत. तुमच्या कामाचा लेखाजोगा दाखवा, असे आवाहनही लंके यांनी या वेळी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.