Loksabha Election 2024 : निवडणूक संपेपर्यंत कारवाई होणार नाही ; थकबाकीप्रकरणी प्राप्तिकरचा काँग्रेसला दिलासा

तब्बल साडेतीन हजार कोटी रुपयांच्या प्राप्तिकर थकबाकीप्रकरणी काँग्रेस पक्षाला आज मोठा दिलासा मिळाला. आगामी लोकसभा निवडणूक होईपर्यंत पक्षावर कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई करणार नसल्याचे प्राप्तिकर विभागाने आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सांगितले.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024sakal
Updated on

नवी दिल्ली : तब्बल साडेतीन हजार कोटी रुपयांच्या प्राप्तिकर थकबाकीप्रकरणी काँग्रेस पक्षाला आज मोठा दिलासा मिळाला. आगामी लोकसभा निवडणूक होईपर्यंत पक्षावर कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई करणार नसल्याचे प्राप्तिकर विभागाने आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सांगितले.

प्राप्तिकर विभागाकडून आज सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयामध्ये युक्तिवाद केला. सध्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्याने आम्ही कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई करणार नाहीत असे मेहता यांनी स्पष्ट केले. न्या. बी.व्ही. नागरत्ना आणि न्या. ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्यापीठासमोर सुनावणी पार पडली.

मेहता म्हणाले, ‘‘ प्राप्तिकर विभागाला निवडणुकीच्या काळामध्ये कोणत्याही राजकीय पक्षासमोर अडचणी निर्माण करायच्या नाहीत.’’ दिल्ली उच्च न्यायालयाने २०१६ मध्ये एका दिवाणी खटल्याच्या सुनावणीदरम्यान दिलेल्या आदेशांना काँग्रेसने २०१८ मध्ये याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले होते. प्राप्तिकर विभागाने काँग्रेसला बजावलेल्या नोटिशीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका पक्षाकडून न्यायालयामध्ये सादर करण्यात आली होती.

आजच्या सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात काँग्रेस पक्षावर कठोर कारवाई होणार नसल्याचे प्रतिज्ञापूर्वक सांगितले. लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने प्राप्तिकर विभाग यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी होईपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करणार नाही. पुढील सुनावणीची तारीख जुलै महिन्यातील दुसऱ्या आठवड्यातील द्यावी, अशी मागणी मेहता यांनी केली.

गेल्या काही दिवसांत काँग्रेस पक्षाला प्राप्तिकर विभागाने अनेक नोटिसा पाठविल्या असून यात हिशेब वेळेत न देणे तसेच इतर अनियमिततेच्या कारणावरून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. प्राप्तिकर विभागाने काँग्रेसच्या दिल्लीतील चार बँकांमधील ९ खात्यांमधून २१५ कोटी रुपये काढून घेतले आहेत असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला.

काँग्रेस पक्षाने या हंगामी अर्जात उपस्थित केलेल्या मुद्यांचा याचिकेशी संबंध नाही पण भविष्यात येऊ घातलेल्या परिस्थितीचा विचार करून प्राप्तिकर विभागाने बजावलेल्या ३५०० कोटी रुपयांच्या थकबाकीच्या नोटिशीच्या आधारावर कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नसल्याचे प्राप्तिकर विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. पुढील सुनावणी २४ जुलैला होणार असल्याचे सांगण्यात आले.

काँग्रेसतर्फे अभिषेक मनु सिंघवी व खासदार विवेक तनखा यांनी बाजू मांडली. देशातील १४० कोटी भारतीयांचा आवाज दडपण्यासाठी केंद्र सरकारने पूर्वग्रहदूषित पद्धतीने ही कृती केली आहे. भाजपचे हे लोकशाहीविरोधी कृत्य आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही.

- प्रियांका गांधी,

काँग्रेसच्या सरचिटणीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.