Loksabha Election 2024 : भाजपच्या आठव्या यादीमध्ये आयाराम ; परनीत कौर, भर्तृहरी महताब यांना संधी

भाजपकडून आज उमेदवारांची आठवी यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये आयारामांना संधी देण्यात आली असून, त्यात काँग्रेसच्या परनीत कौर, रवनीतसिंग बिट्टू, बिजू जनता दलाचे भर्तृहरी महताब व ‘आप’चे सुशीलकुमार रिंकू यांचा समावेश आहे.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024sakal
Updated on

नवी दिल्ली : भाजपकडून आज उमेदवारांची आठवी यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये आयारामांना संधी देण्यात आली असून, त्यात काँग्रेसच्या परनीत कौर, रवनीतसिंग बिट्टू, बिजू जनता दलाचे भर्तृहरी महताब व ‘आप’चे सुशीलकुमार रिंकू यांचा समावेश आहे.

या यादीतील अकराजणांच्या यादीत ओेडिशातील तीन, पंजाबचे आठ तर पश्चिम बंगालच्या दोन उमेदवारांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपात दाखल झालेल्या बिजू जनता दलाच्या भर्तृहरी महताब यांना पक्षाने कटक या त्यांच्या पारंपारिक मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

Loksabha Election 2024
Manoj Jarange : अपक्ष उमेदवारही देणार नाही ; जरांगेंची घोषणा, निवडणुकीच्या मैदानातून माघार

काँग्रेसमधून भाजपात आलेल्या माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या पत्नी परनीत कौर यांना पतियाळा, माजी मुख्यमंत्री बेअंतसिंग यांचे नातू रवनीतसिंग बिट्टू यांना लुधियाना व ‘आप’मधून भाजपत दाखल झालेल्या सुशीलकुमार रिंकू यांना जालंधर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

गेल्या निवडणुकीत दिल्लीतून निवडणूक लढलेल्या लोकगायक हंसराज हंस यांना फरीदकोट मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील वीरभूम मतदारसंघातून आयपीएस अधिकारी देवाशिष धर यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे. प्रसिद्ध अभिनेता सनी देओल यांना गुरुदासपूरमधून पुन्हा उमेदवारी मिळालेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()