लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी आंध्र प्रदेशातील एलुरू जिल्ह्यात एका बसच्या तपासणी वेळी 22 लाखांची बेहिशेबी रोकड जप्त केली.
ही जप्त केलेली रोकड आध्र प्रदेश राज्य परिवहन महामंडळाच्या मालवाहू बसमध्ये सापडली. जी हैदराबादहून जांगरेड्डीगुडेमला जात होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
जांगरेड्डीगुडेमचे पोलीस उपाधिक्षक रवी चंद्रन यांनी सांगितले की, त्यांना माहिती मिळाली होती की परिवहन महामंडळाच्या बसमधून मोठ्या प्रमाणात रोकड नेली जात आहे.
ते पुढे म्हणाले, आम्ही बट्टीगोडेम येथे ही बस अडवली आणि त्यातील माल खाली उतरवला त्यावेळी आम्हाला 22 लाखांची बेहिशेबी मालमत्ता सापडली. निवडणूक नियमांनुसार आम्ही ही रोकड जप्त केली असून, ही मालवाहू बस पोलीस स्थानकात नेली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल.
दरम्यान आंध्र प्रदेशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची 16 मार्च रोजी घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे.
आंध्र प्रदेशात लोकसभा आणि विधानसभेसाठी 13 मे रोजी मतदान होणार असून, याची मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे.
आंध्र प्रदेशात विधानसभेसाठी 175 जागा आहेत. तेथे बहुमत मिळवण्यासाठी 88 आमदारांची आवष्यकता असते.
आंध्र प्रदेशात 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्राबाबू नायुडू यांच्या नेतृत्त्वाखालील तेलुगू देसम पक्षाने सर्वाधिक 102 जांगांसह बहुमत मिळवले होते. तर सध्या सत्तेत असलेल्या जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षाला 67 जागांवर समाधान मानावे लागले होते. तर भारतीय जनता पक्षाला अवघ्या 4 जागा मिळाल्या होत्या.
दुसरीकडे 2019 मध्ये देशभरात पंतप्रधान मोदींची लाट असताना, आंध्र प्रदेशात जगन मोहन रेड्डी यांची लाट निर्माण झाली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्त्वाखालील YSRCP ने तब्बल 151 जागा जिंकत तेलुगू देसम पक्षाचा सुपडा साफ केला होता.
दरम्यान, देशभरात आता 543 जागांवर लोकसभा निवडणूक होत असून, यासाठी 7 टप्प्यांत मतदान होणार आहे. याचा पहिला टप्पा 19 एप्रिल रोजी सुरू होणार आहे. तर मतमोजणी 4 जून रोजी होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.