या दराबाबत राजकीय पक्षांना माहिती देण्यात आली आहे. यावर काही राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आक्षेप नोंदवले होते.
सातारा : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) लढवणाऱ्या उमेदवाराला ९५ लाख रुपयांची खर्च मर्यादा आहे. मागील लोकसभा निवडणुकीत ही खर्च मर्यादा ७० लाख रुपये होती. आता लोकसभेची निवडणूक सुरू झाल्याने उमेदवारांना खर्च करावाच लागणार आहे. हे लक्षात घेऊन प्रशासकीय यंत्रणेने प्रचार खर्चाचे प्रारूप दर निश्चित केले आहेत. यामध्ये चहाचा कप आठ रुपये, कॉफी दहा रुपये, पाण्याची बाटली १७, वडापाव १०, मिसळ ४०, शाकाहारी साधे जेवण ७० रुपये, विशेष शाकाहारी जेवण १२०, मांसाहारी १२० रुपये असे दर निश्चित केले आहेत.
राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी निवडणूक यंत्रणेने प्रचार खर्चाचे प्रारूप दर निश्चित केले आहेत. हे दर निश्चित करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय पक्षांची बैठक झाली. याला काही हरकती व आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने याबाबतचे सर्व अधिकार जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार स्थापन केलेल्या समितीने हे दर निश्चित केले आहेत.
या दराबाबत राजकीय पक्षांना माहिती देण्यात आली आहे. यावर काही राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आक्षेप नोंदवले होते. यानंतर जिल्हा प्रशासन आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी नोंदवलेल्या हरकती लक्षात घेऊन हरकती घेतलेल्यांमध्ये मंडप, खुर्ची, वाहतूक खर्चाचा समावेश होता. त्यामध्ये बदल करण्यात आला आहे.
खाद्यपदार्थांचे दर (रुपयांत) : चहाचा कप आठ रुपये, कॉफी दहा रुपये, पाण्याची बाटली १७, शीतपेय २०, वडापाव १०, समोसा १५, पोहे १५, शिरा १०, उपीट १५, मिसळ ४०, इडली २५, डोसा-उत्ताप्पा १५, मिसळ-पावभाजी ६०, साधे शाकाहारी जेवण ७० रुपये, मांसाहारी १२० रुपये असे दर निश्चित केले आहेत.
वाहतुकीचे दर (रुपयांमध्ये) : दुचाकी ६०० ते ११००, रिक्षा ८०० आणि १३००, जीप, ट्रॅक्स, बोलेरो, टाटा सुमो, तवेरा २९०० ते ३९००, टाटा विक्टा, इंडिका, इंडिगो, फोर्ड आयकॉन, स्विफ्ट (वीस प्रवासी) २५०० व ३३००, स्कॉलिस, स्कार्फियो, महिंद्र झायलो २९०० ते ३९००, वेरणा, होंडासिटी, स्विफ्ट डिझायर, टाटा इंडिगो ३००० ते ३३००, १४ प्रवासी बस ४२०० ते ६०००, १७ प्रवासी बस ४६०० ते सहा हजार, २५ प्रवासी बस एसी, नॉन एसी ७१०० ते १०२००, ३५ प्रवासी बस ८४०० ते १२०००, ४५ प्रवासी बस १०१०० ते १४,४००, ५० प्रवासी बस १०,५०० ते १५०००, पाण्याचे टॅंकर ६०० ते ११०० रुपये, जेसीबी ९०० रुपये प्रतितास.
मंडप आणि इतर दर (रुपयांमध्ये) : मंडप फर्निचर वीज साहित्यासह व्यासपीठ प्रतिचौरस फूट ७, मंडप प्रतिचौरस फूट १०, बॅरिकेट्स (बांबू-रनिंग फूट) ३०, प्रतिखुर्ची सहा रुपये, व्हीआयपी खुर्ची ८०, लाकडी टेबल ४० रुपये, लोखंडी टेबल ५० रुपये, व्हीआयपी टीपॉय २५०, जनरेटर तीन हजार ते दहा हजार, फटाके माळ ३०० ते २५००, तसेच छायाचित्र, ऑडिओ-व्हिडिओ क्लिपचे दर ही निश्चित करण्यात आले आहेत.
निवडणुकीसाठी प्रचार करणाऱ्या उमेदवारांच्या प्रचार यंत्रणेसाठी जिल्हा प्रशासन खाद्यपदार्थ, वाहतूक, मंडप आणि इतर साहित्याचे दर जाहीर करते. त्यामुळे प्रचार करणाऱ्या यंत्रणेला त्याप्रमाणे आपला खर्च दाखवता येणे सोपे होते; पण केवळ निवडणुकीपुरते हे दर ठरविण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला निवडणूक आयोग देते. त्याप्रमाणे सर्वसामान्य जनतेलाही हेच दर मिळावेत, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.