साउथ मेन रस्ता मध्यरात्रीपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. लेन क्रमांक दोन, तीन आणि चार आवश्यकतेनुसार वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल.
पुणे : पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी (Pune Baramati Lok Sabha Counting) कोरेगाव पार्क (Koregaon Park) येथील भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) गोदामामध्ये मंगळवारी (ता. ४) होणार आहे. यादिवशी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोरेगाव पार्क परिसरात तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. तसेच, सरकारी आणि खासगी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कोरेगाव पार्क परिसरातील वाहतुकीची परिस्थिती लक्षात घेता चार जून रोजी पहाटे पाच ते सायंकाळी पाच या कालावधीत ब्ल्यू डायमंड चौक ते सर्किट हाउस चौकदरम्यान हलक्या वाहनांची एकेरी वाहतूक सोडण्यात येईल. तसेच, साउथ मेन रस्ता मध्यरात्रीपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. लेन क्रमांक दोन, तीन आणि चार आवश्यकतेनुसार वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल. पर्यायी मार्ग : नॉर्थ मेन रस्ता आणि अंतर्गत गल्ल्यांचा वापर करावा.
चार जून रोजी मुंढवा, कोरेगाव पार्क आणि बंडगार्डन भागातील ताडीगुत्ता, एबीसी फार्म चौक, के.पी. जंक्शन, महात्मा गांधी जंक्शन, ब्ल्यू डायमंड चौक, मोबोज चौक, जहाँगीर चौक, कौन्सिल हॉल चौक, नॉर्थ मेन रस्ता, बंडगार्डन रस्ता आणि कोरेगाव पार्क रस्ता परिसरात सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे.
पूज्य कस्तुरबा गांधी नॉर्थ मेन रस्ता, कोरेगाव पार्क
(फक्त प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी) - ७००
रोही व्हिला लॉन्स, कोरेगाव पार्क लेन क्रमांक सात
(नागरिकांसाठी दुचाकी आणि चारचाकी वाहने) - ७००
द पूना स्कूल ॲण्ड होम फॉर द ब्लाइंड ट्रस्ट, नॉर्थ मेन रस्ता, कोरेगाव पार्क
(सर्वांसाठी चारचाकी वाहने) - ९००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.