Raj Thackeray: ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरे घेणार सभा! भेटीनंतर श्रीकांत शिंदेंनी सांगितली स्ट्रॅटेजी

महायुतीचे उमेदवार म्हणून ठाण्यातून शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के आणि कल्याणमधून विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे.
MNS Raj Thackeray
MNS Raj Thackeraysakal
Updated on

मुंबई : महायुतीचे उमेदवार म्हणून ठाण्यातून शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के आणि कल्याणमधून विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या दोघांनी शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

यावेळी या दोन मतदारसंघात त्यांनी सभा घ्यावी अशी विनंती या दोघांकडून करण्यात आली. त्यावर राज ठाकरे हे सभा घेणार असल्याची माहिती खुद्द नरेश म्हस्के यांनी दिली. (Raj Thackeray will hold meeting in Thane Kalyan Loksabha Constituency says Srikant Shinde after meet)

MNS Raj Thackeray
China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

श्रीकांत शिंदे म्हणाले, आज नरेश म्हस्के आणि माझी उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर झाली. त्यानंतर राज ठाकरेंचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही त्यांची भेट घेतली त्यांनी आम्हाला भरभरुन आशीर्वादही दिला. येणाऱ्या काळात ठाणे आणि कल्याण लोकसभेसाठी त्यांची सभा देखील होईल, त्यांचं सहाकार्य पहिल्यापासून आहे, प्रेम आहे. (Latest Marathi News)

MNS Raj Thackeray
Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

मनसे आता ठरवेल की राज ठाकरेंच्या किती सभा घ्यायच्या. पण त्यांच्या सभेनं प्रचाराला दिशा देण्याचं काम राज ठाकरे करतात. राज ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी सर्वाधिक तरुण पिढी पुढे येते. त्यांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही देखील इच्छुक आहोत, आमचे मतदार नागरिकही आहेत. राज ठाकरेंनी महायुतीकडं कुठलीही अपेक्षा न करता त्यांनी मोठ्या मनानं पाठिंबा दिला आहे.

यानंतर मनसेचे कार्यकर्ते हे आधीच कामाला लागले आहेत. पण आता राज ठाकरेंच्या प्रचारानं मोठी ताकद महायुतीच्या उमेदवारांच्या मागे उभी करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.