Loksabha Election 2024 : शक्‍तिप्रदर्शन ; विदर्भातून राणा, पाटील,आंबेडकरांनी भरला अर्ज,मराठवाड्यातून कदम, चिखलीकर मैदानात

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम या पाच, तर मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी या तीन मतदारसंघांसाठी येत्या २६ एप्रिल रोजी मतदान होत आहे.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 sakal
Updated on

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम या पाच, तर मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी या तीन मतदारसंघांसाठी येत्या २६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. अमरावतीच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना जात प्रमाणपत्रप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर आज त्यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर राणा यांच्या प्रचारार्थ फडणवीस यांची सभा पार पडली. यवतमाळ मतदारसंघातील ‘महायुती’च्या उमेदवार राजश्री पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नामांकन दाखल केले. येथूनच बहुजन समाज पक्षाकडून माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी उमेदवारी अर्ज भरला.

मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडली

मराठवाड्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हिंगोली मतदारसंघातून बाबूराव कदम कोहळीकर यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. यानंतर शिंदे यांची सभाही पार पडली. नांदेडला प्रताप पाटील चिखलीकरांनी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित होते. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने परभणीतील उमेदवार अचानक बदलला असून येथून आता पंजाब डख यांना संधी देण्यात आली आहे.

आंबेडकरांची मनधरणी सुरू

अकोल्यातून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. यावेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमध्ये यावे म्हणून काँग्रेसकडून अद्याप प्रयत्न सुरूच आहेत. आंबेडकर यांनी जागांबाबत माझ्याकडे प्रस्ताव सादर करावा मी तो पश्रश्रेष्ठींकडे देईल असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने माघार घेतली आहे. ‘वंचित’ने या मतदारसंघातून जाहीर केलेल्या उमेदवारास उमेदवारी अर्ज दाखल करू नये अशा सूचना प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी दिल्या आहेत. यासोबतच आनंदराज आंबेडकर यांनाही अर्ज मागे न घेण्याचा सल्ला दिला आहे.

आमची शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आहे. या शिवसेनेमध्ये कोणी मालक आणि नोकर नाही. सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा म्हणून मी मुख्यमंत्री झालो. त्याच पद्धतीने बाबूराव कदम कोहळीकर यांच्या रूपाने शेतकऱ्याच्या मुलाला उमेदवारीची संधी दिली आहे.

- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री (हिंगोलीतील सभेतून)

मराठवाडा, विदर्भाच्या विकासाची जबाबदारी भाजप आणि महायुतीची आहे. खा. अशोक चव्हाण, खा. डॉ. अजित गोपछडे यांच्यासह नांदेडचे प्रताप पाटील चिखलीकर हे दिल्ली दरबारी या भागाच्या विकासाचाच प्रयत्न करतील. मराठवाड्यासह नांदेडच्या विकासाच्या अटीवरच अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री (नांदेडच्या सभेतून)

२६ एप्रिल ः दुसऱ्या टप्प्याचे मतदान

मतदारसंघ

३५२

रिंगणातील उमेदवार

४७७

नामांकने दाखल

८ एप्रिल

उमेदवारी मागे घेण्याची मुदत

नांदेडमधून (सर्वाधिक)

७४ उमेदवार

९२ दाखल नामांकने

वर्ध्यातून (सर्वांत कमी)

२७ उमेदवार

३८ दाखल नामांकने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.