नागपूर : जात पडताळणीत अपात्र ठरल्यानं रश्मी बर्वे यांना काँग्रेसकडून रामटेकचं तिकीट मिळूनही माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर आता याच कारणामुळं त्यांचं जिल्हा परिषद सदस्यत्व देखील रद्द झालं आहे. त्यामुळं बर्वे यांना हा दुसरा झटका बसला आहे. रश्मी बर्वे या नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राहिल्या आहेत. (Rashmi Barve zilla parishad membership also cancelled another blow to nagpur congress leader)
अनुसुचित जातीसाठी राखीव जिल्हा परिषद सर्कलमधून त्या निवडून आल्या होत्या. त्याचबरोबर काँग्रेसनं त्यांना रामटेक लोकसभा मतदारसंघातून तिकीटंही दिलं होतं. पण जात पडताळणीमध्ये त्या अपात्र ठरल्यानं त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक पीठासीन अधिकाऱ्यांनी बाद ठरवला होता. (Latest Marathi News)
त्यानंतर आता त्यांचा जिल्हा परिषद सदस्यत्वाचा अर्जही बाद ठरवण्यात आला आहे. त्यामुळं झेडपी सदस्य म्हणून रश्मी बर्वे यांनी जितका काळ घालवला त्या काळातील त्यांच्यावर झालेला सरकारी खर्च हा वसूल केला जाणार आहे. (Marathi Tajya Batmya)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.