Lok Sabha Result: बाळासाहेबांचा गड शिंदेंनी भाजपला दिला! रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये काय घडलं? ठाकरे गट आजही भक्कम कसा?

Narayan Rane Won Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून महायुतीने बाजी मारली असली तरीही रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील मतांचा टक्का अपेक्षेपेक्षा कमी झाल्याने महायुतीत एकमेकाकडे संशयाने पाहिले जाण्याची शक्यता असून कुरबुरीही वाढण्याची शक्यता आहे.
Narayan Rane Won Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha
Narayan Rane Won Ratnagiri-Sindhudurg Lok Sabhaesakal
Updated on

रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ४७ वर्षानंतर कमळ फुलेले आहे. अस्तित्वाच्या लढाईत ठाकरे गटाचा पराभव झाला. भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवडणूक रिंगणात उतरविल्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची लढत प्रतिष्ठेची झाली होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या या आधी दोनदा खासदार झालेल्या विनायक राऊत यांचे आव्हान त्यांच्यासमोर होते. शिवसेनेला असलेली सहानुभूती, जातीय ध्रुवीकरणाची शक्यता, रत्नागिरीत असलेले संघटनात्मक बळ याच्या जोरावर लढणाऱ्या राऊत यांचे बळ भाजपच्या नियोजनबद्ध रणनीतीसमोर कमजोर पडले. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये निकाल कसा बदलाल, याबाबत जाणून घेऊया.

शिवसेनेतील फुटीनंतर मंत्री दीपक केसरकर आणि उदय सामंत हे शिंदे शिवसेनेत आले. साहजिकच त्यांच्या अनुक्रमे सावंतवाडी आणि रत्नागिरी मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचे बळ कमी झाले. त्या दोघांनी राणेंसाठी ताकद लावली.

बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आजही तळागाळात  -

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून महायुतीने बाजी मारली असली तरीही रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील मतांचा टक्का अपेक्षेपेक्षा कमी झाल्याने महायुतीत एकमेकाकडे संशयाने पाहिले जाण्याची शक्यता असून कुरबुरीही वाढण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाल्यामुळे ठाकरे शिवसेना तळागाळात आजही भक्कम असल्याचे या निमित्ताने अधोरेखित झाले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालावर नजर टाकली तर रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे राऊत यांना दहा हजार मताधिक्य मिळाले आहे. रत्नागिरी हा शिवसेनेचा बालेकिल्ला. त्यातील वजनदार नेते शिंदे गटाकडे आलेले त्यामुळे या मतदार संघातून चांगल्या मताधिक्याची अपेक्षा महायुतीला होती. महायुतीची सर्वाधिक मदार शिंदे शिवसेनेकडे होती. ग्रामीण भागात शिवसेना तर शहरी भागात भाजपचा बोलबाला असल्यामुळे त्याप्रमाणे प्रचारयंत्रणाही राबविण्यात आली होती. भाजप आणि शिंदे शिवसेना अशी दुहेरी ताकद प्रचारात उतरलेली होती.

रत्नागिरीमधून १ लाख ७२ हजार १३९ मतदान झाले होते. त्यात विनायक राऊत यांना ८२ हजारापेक्षा अधिक मतदान झाले तर महायुतीच्या नारायण राणे यांना ७२ हजारापेक्षा अधिक मतदान झाले. महायुतीचे राणे विजयी झाले असले तरीही रत्नागिरी विधानसभा मतदार संघात अपेक्षित आघाडी घेता आलेली नाही. प्रचारावेळी शिंदे शिवसेनेतील अंतर्गत दुही दिसून आली होती. त्यामुळे समन्वयाचा अभाव दिसून आला होता. अंतिम टप्प्यात शिंदे शिवसेनेकडून त्यावर पांघरूण घालण्यात काही प्रमाणात यशही मिळाले होते. दुसरीकडे रत्नागिरीतील ग्रामीण भागामध्ये प्रचारादरम्यान ठाकरे शिवसेनेकडून जोर लावण्यात आला होता. त्याचा फायदा ठाकरे सेनेला मिळाल्याची चर्चा सुरु आहे.

Narayan Rane Won Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha
Nashik Lok Sabha Election 2024 Result : भगरे यांच्या विजयाने ‘राष्ट्रवादी’चा वनवास संपला! पहिल्या निवडणुकीत भगरे दिल्लीत

राज्यातील राजकीय घडामोडीनंतर रत्नागिरीचे आमदार उदय सामंत शिंदे शिवसेनेत राहिले. त्यांच्याबरोबर तळागाळातील शिवसेना राहिल्याची अटकळ बांधली जात होती. त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत मिळेल असा अंदाज होता; परंतु प्रत्यक्षात हा अंदाज फोल ठरल्याचे आकडेवारी सांगते तसेच ठाकरे शिवसेनेची मते आजही तळागाळात स्थिर असल्याचेच या मताधिक्याने दाखवून दिले आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत या मतदार संघातून युतीला १ लाख १८ हजार मते मिळाली होती. त्यात शिवसेना आणि भाजपच्या मतांचा समावेश होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक निकालात दुभंगलेल्या शिवसेनेच्या मतांचा टक्का कमी झाल्याचीच चर्चा सुरू असून ठाकरे शिवसेना ग्रामीण भागात भक्कम असल्याचे दिसून येत आहे.

राणे ठाण मांडून

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळणारे मताधिक्य रत्नागिरी जिल्ह्यात राऊत यांना मिळणारे मताधिक्य तोडून राणे पुढे जात होते. त्यामुळे राणेंचा आत्मविश्वास वाढला. ते मतमोजणी केंद्रावर शेवटपर्यंत ठाण मांडून होते. अखेर १५ ते १८ व्या फेरीनंतर राणेंनी विजय आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले. 45 हजाराचे मताधिक्य तोडणे राऊत यांना शक्य नव्हते. त्यामुळे भाजपच्या गोटात जल्लोष सुरू होता. नारायण राणे निवडून आले हे निश्चित झाल्यानंतर गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त करण्यात आला.

Narayan Rane Won Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha
Lok Sabha Election Result 2024 : ‘लोकसभा निवडणुकीचा ‘निकाल परिवर्तनाला पोषक’ - शरद पवार

उमेदवारनिहाय मिळालेली मते

राजेंद्र आयरे   - ७८५६
नारायण राणे  - ४,४८,५१४
विनायक राऊत - ४,००,६५६
अशोक पवार    - ५२८०
मारूती जोशी   - १०,०३९
सुरेश शिंदे      - २२४७
अनंत तांबडे   - ५५८२
विनायक लहु राऊत -१५,८२६
शकील सावंत - ६३९५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.