Satara Lok Sabha : साताऱ्यात शिवेंद्रराजेंची भूमिका ठरणार महत्त्वाची; उदयनराजेंबाबत नाराजी, शिंदेंना मिळणार सहानुभूती?

सातारा लोकसभा मतदारसंघात दोन्ही उमेदवार सातारा व जावळी तालुक्यांतील आहेत.
Satara Lok Sabha Constituency
Satara Lok Sabha Constituencyesakal
Updated on
Summary

महायुतीचा धर्म पाळण्याची अट शिवेंद्रसिंहराजे यांनी मनावर धरली, तर उदयनराजे यांच्या बाजूने ते ताकद लावतील.

Satara Lok Sabha : सातारा लोकसभा मतदारसंघात दोन्ही उमेदवार सातारा व जावळी तालुक्यांतील आहेत. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपमध्ये असल्याने त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. शिवेंद्रसिंहराजे समर्थकांत उदयनराजेंबाबत काही प्रमाणात नाराजी आहे, तर जावळीचे भूमिपुत्र असल्याने शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांना सातारा, जावळीत विशेष लक्ष द्यावे लागेल. दोन्ही राजांचे मनोमिलन कार्यकर्त्यांपर्यंत आणि मतदारांपर्यंत पाझरणार का, यावर सर्व काही अवलंबून आहे.

Satara Lok Sabha Constituency
Supriya Sule : 'शरद पवारांना संपविणं एवढं सोपं नाही'; सुप्रिया सुळेंचा कोणावर वार?

सातारा व जावळी विधानसभा मतदारसंघात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांची ताकद आहे. त्यांनी आतापर्यंत ज्या- ज्या वेळी लोकसभेच्या निवडणुकीत ते ज्या पक्षात असतील, त्यांच्या उमेदवाराला मताधिक्य दिले आहे. आता लोकसभेसाठी दोन्ही राज्यांमध्ये मनोमिलन झाले असले, तरी ते कार्यकर्ते व मतदारापर्यंत पाझरने आवश्यक आहे. अन्यथा यावेळेस सातारा व जावळी तालुक्यांतील मतदार सर्वसामान्य स्थानिक उमेदवाराला साथ देणार, की राजघराण्याला याची उत्सुकता आहे.

आमदार शशिकांत शिंदे यांचे मूळ गाव जावळी तालुक्यातील हुमगाव आहे. तालुक्यातील उमेदवार म्हणून जावळीकर त्यांच्या पाठीशी ठाम राहण्याची शक्यता अधिक आहे. त्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे हे शेवटच्या क्षणी कोणती खेळी खेळणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. सध्या तरी खासदार शरद पवार यांच्याबाबत सहानुभूतीची लाट कायम आहे, हे दोन दिवसांपूर्वीच्या शशिकांत शिंदे यांच्या शक्तिप्रदर्शनातून दिसून आले आहे. त्याचाही प्रभाव सातारा व जावळीत पाहायला मिळेल.

Satara Lok Sabha Constituency
'त्या' वादग्रस्त वक्तव्यानंतर मंडलिक-मालोजीराजे आले एकत्र; दोघांना एकत्र बघून लोकही झाले अवाक्‌, असं काय घडलं?

महायुतीचा धर्म पाळण्याची अट शिवेंद्रसिंहराजे यांनी मनावर धरली, तर उदयनराजे यांच्या बाजूने ते ताकद लावतील. कारण आगामी विधानसभा निवडणुकीत उदयनराजे यांचा त्रास टाळण्यासाठी ते मताधिक्य देण्याचा प्रयत्न करतील यात शंका नाही; पण लोकांना बदल अपेक्षित धरला तर मात्र, शशिकांत शिंदे यांच्या बाजूने सातारा व जावळी तालुका राहण्याची शक्यता आहे.

जावळीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे दीपक पवार यांची ताकद एका जिल्हा परिषद गटात आहे, तर अजित पवार गटाचे अमित कदम यांची ताकद असून, त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार कोणाच्या पाठीशी राहा, हे सांगतील त्यावर सर्व काही अवलंबून आहे. सौरभ शिंदे यांनी प्रतापगड कारखान्याच्या माध्यमातून शिवेंद्रसिंहराजे यांनी ताकद दिली आहे. त्यामुळे ते शिवेंद्रसिंहराजे सांगतील त्यांच्या पाठीशी राहतील.

Satara Lok Sabha Constituency
'विझलो जरी मी, हा माझा अंत नाही'; मुख्यमंत्र्यांचा फोन अन् लोकसभा निवडणुकीतून चेतन नरकेंची माघार

सातारा शहर हे आजपर्यंत राजे गटाच्या ताब्यात असले, तरी यावेळेस त्यांची मते उदयनराजे आणि शशिकांत शिंदे यांच्यात विभागण्याची शक्यता आहे. सातारा व जावळी तालुका कोणाला साथ देणार त्यावर येथील दोन्ही उमेदवारांचे मताधिक्य अवलंबून राहणार आहे. सातारा व जावळी तालुक्यात शिवसेना व काँग्रेसची ताकद आहे; पण ही ताकद उदयनराजे व शशिकांत शिंदे यांच्यात विभागणार आहे. मनसे महायुतीसोबत राहणार असून, रिपब्लिकन पक्ष ही महायुतीसोबतच राहणार आहे. त्यामुळे सातारा व जावळीतून राजघराण्यातील उमेदवाराला की सर्वसामान्य निष्ठावंत उमेदवाराला मताधिक्य मिळणार याची उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.