Sangli Lok Sabha : विशाल काय करणार? चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर होताच सोशल मीडियावर नवा 'ट्रेंड'

वंचित आघाडीकडून चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीचा उल्लेख झाला.
Sangli Lok Sabha Constituency
Sangli Lok Sabha Constituencyesakal
Updated on
Summary

शेवटच्या क्षणापर्यंत (?) प्रयत्न करूनही उमेदवारी मिळाली नाही, याचे खापर आता कोणी कोणावर फोडायचे?

सांगली : सांगली लोकसभेची (Sangli Lok Sabha Constituency) जागा महाविकास आघाडीत कोण लढणार, याबद्दल गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून असलेल्या घोळावर मुंबईत महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) पत्रकार परिषदेत चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांची उमेदवारी जाहीर झाल्याने पडदा पडला की, जिल्ह्याच्या राजकीय रंगमंचाचा पडदा उघडला, हे यथावकाश स्पष्ट होईल.

मात्र या रंगमंचावर विशाल पाटील (Vishal Patil) असतील, तरच रंगत येणार, याबद्दल कोणालाही शंका नाही. विशाल काय करणार, हा आज दिवसभराचा चर्चेचा विषय होता. समाजमाध्यमांवर तोच ‘ट्रेंड’ चर्चेत होता. वंचित आघाडीकडून चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीचा उल्लेख झाला. तोपर्यंत तरी ‘सांगली’चे मैदान संजय पाटील आणि विशाल पाटील यांच्यातच, असे एकूण चित्र होते.

Sangli Lok Sabha Constituency
'सांगली'त गोंधळ, 'हातकणंगले'त चिंता; शिवसेनेकडून काँग्रेसची अभूतपूर्व कोंडी, वाळवा-शिराळ्यातील मतदान ठरणार निर्णायक

११ मार्चला चंद्रहार पाटील यांचा ‘मातोश्री’वर मुंबईत शिवसेनेत प्रवेश झाला आणि महाविकास आघाडीची उमेदवारी शिवसेनेच्या पारड्यात जाणार, हे स्पष्ट झाले. तेव्हापासून विश्‍वजित कदम यांच्यावर उमेदवारी मिळवण्याची जबाबदारी सांगलीतील काँग्रेस नेत्यांनी जाहीर केली. शेवटच्या क्षणापर्यंत (?) प्रयत्न करूनही उमेदवारी मिळाली नाही, याचे खापर आता कोणी कोणावर फोडायचे? गेल्या पंधरा दिवसांपासून काँग्रेस कार्यकर्ते आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर होते.

Sangli Lok Sabha Constituency
'शाहू महाराज निवडणुकीला उभे राहिलेत, पण त्यांचा राजहट्ट पूर्ण करण्यासाठी कोल्हापूरकर बांधील नाहीत'; मंडलिकांचा थेट वार

काल रात्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांसमवेत चर्चा नाकारली, तेव्हाच ‘सांगली’ काँग्रेसला सुटणार नाही, हे स्पष्ट झाले. मंगळवारी सकाळी ते पत्रकार परिषदेतून जाहीर झाले. या सर्व घटनाक्रमानंतर विशाल पाटील पुढे काय करणार, याकडे राजकीय वर्तुळात सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. ‘माझं काय चुकलं?’ असा सवाल करीत विशाल पाटील यांची ‘पोस्ट’ सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाली. त्यातून सांगलीसह जिल्हाभरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये ‘अंडरकरंट’ जाणवत होता. विश्‍वजित कदम यांच्यासह काँग्रेस नेत्यांचे फोन ‘नॉट रिचेबल’ झाल्याच्या न्यूजलाईन्स न्यूज चॅनेल्सवर झळकू लागल्या.

Sangli Lok Sabha Constituency
Sangli Lok Sabha : चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवरुन काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांचा संताप; 'आर-पार'च्या लढाईसाठी नेत्यांना आवाहन

विशाल पाटील यांचा जिल्हाभरातील कार्यकर्ते, नेते यांच्याशी फोनद्वारे संपर्क सुरू होता, तर त्यांचे समर्थक ‘लढायचेच,’ असा इरादा समाजमाध्यमांवर जाहीर करीत होते. ‘सगळ्यांना पुरून उरणार म्हणून दादांच्या विरोधात एवढं कटकारस्थान’ यांसह अशा अनेक ‘कॅचलाईन’च्या ‘पोस्ट’ दिसत होत्या. सायंकाळपर्यंत विशाल यांच्याकडून कोणताच स्पष्ट सिग्नल आला नव्हता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()