सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल प्रकाशबापू पाटील यांचा मोठा विजय झाला आहे. त्यांनी भाजपचे संजय काका पाटील यांचा 1 लाख 53 मतांनी पराभव केला आहे. संजय काका या जागेवरून दोनदा खासदार झाले होते. त्यांना 4 लाख 71 हजार 613 मते मिळाली आहेत.
विजयी झालेल्या अपक्ष विशाल प्रकाशबापू यांना 4 लाख 71 हजार 613 मते मिळाली. त्याचवेळी या जागेवर शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आपले डिपॉझिटही वाचवू शकले नाहीत. त्यांना केवळ 60 हजार 860 मते मिळाली. विशाल पाटील यांच्या नियोजन आणि चातुर्याची जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. मात्र त्यांच्या यशामागे त्यांची पत्नी पुजा पाटील यांचा देखील मोठा वाटा आहे.
सगळ्यांचे कष्ट फळाला आलेत, अपक्ष उमेदवारांनी पाठिंबा दिला त्याबद्दल आनंद आहे. मतदारसंघात महिलांचे अनेक प्रश्न आहेत, तसेच पाण्यासंबंधित अनेक प्रश्न आहेत ते आम्ही मार्गी लावू अशी प्रतिक्रिया पूजा पाटील यांनी विशाल पाटील यांच्या विजयानंतर दिली होती. पुजा पाटील ह्या देखील प्रचारासाठी मैदानात उतरल्या होत्या. मी सक्षमा या संघटनेच्या त्या संस्थापक अध्यक्ष्या आहेत.
विशाल पाटील यांनी विजयी झाल्यानंतर सहचरणी असे कॅपशन देत पुजा पाटील यांच्यासोबत फोटो पोस्ट केला होता. हळदी कुंकू कार्यक्रम, पैठणीचा समारंभ, वसंतदादा पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्यावतीने आयोजित वसंत करंडक, असे अनेक कार्यक्रम पुजा पाटील यांनी आयोजित केले होते. महिलांना एकत्र करण्याचे काम पुजा पाटील यांनी केले.
पूजा विशाल पाटील यांनी सावळज येथे सांगली लोकसभा निवडणुकीनिमित्त जाहीर सभा देखील घेतली होती. जनता जेव्हा निवडणूक हातात घेते तेव्हा निश्चित बदल घडतो हेच येत्या काळात सिद्ध होणार आहे, असे त्या म्हणाल्या होत्या. विशाल पाटील यांचा लिफाफा त्यांनी गोवोगावी पोहोचवला.
पुजा पाटील यांनी पती विशाल यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचार केला. शेवटच्या मतदारापर्यंत त्या पोहचल्या. मतदारसंघातील गावातील सरपंचाच्या देखील त्यांनी भेटी घेतल्या.
विशाल पाटील यांनी संपूर्ण निवडणुकीत श्रद्धा अन् सबुरीचे दर्शन घडवले. संयम ढळू दिला नाही. जयंत पाटील यांच्याविषयी नागरिकांमध्ये रोष होता, मात्र विशाल यांनी त्यांच्यावर टीका टाळली. विश्वजित यांच्या नेतृत्वाची चर्चा घडवली. वसंतदादा घराण्यावर अन्याय, काँग्रेसची कोंडी, खासदार संजयकाकांचे दहा वर्षांतील अपयश यावर हल्ला चढवला. निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यांवर, मोदींच्या चेहऱ्यावर, हिंदुत्वावर जाणार नाही, याची दक्षता घेतली.
प्रचाराला मोठी फौज नव्हती, मात्र अंडरकरंट जोरात राहिला. वारं उटलं फिरू नये, यासाठी चुका टाळल्या. काय बोलावं, यापेक्षा काय बोलू नये, याची काळजी घेतली गेली. ‘बॅक ऑफिस’ प्रतीक पाटील यांनी सांभाळलं. आई श्रीमती शैलजा पाटील, पत्नी पूजा, वहिनी ऐश्वर्या ही टीम मैदानात उतरली. श्रीमती जयश्री पाटील यांनी सांगली पिंजून काढली. कुटुंब एक झाल्याचा संदेश देखील महत्त्वाचा ठरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.