Sangli Lok Sabha : विशाल पाटलांसाठी मिरजेत धडाडणार प्रकाश आंबेडकरांची तोफ; शेवटच्या दिवशी होणार जोरदार शक्तिप्रदर्शन

अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांना समाजातील विविध घटकांकडून वाढता पाठिंबा मिळत आहे.
Sangli Lok Sabha
Sangli Lok Sabhaesakal
Updated on
Summary

दोन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीने विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला होता. याबाबतचे ट्विट वंचित आघाडीच्या ‘एक्स’ हॅंडलवरून करण्यात आले.

सांगली : सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर (Vanchit Bahujan Aghadi leader Adv. Prakash Ambedkar) यांची रविवारी (ता. ५) मिरजेतील किसान चौकात सकाळी दहा वाजता सभा आहे. त्यानिमित्त प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.

Sangli Lok Sabha
सांगलीत 'वंचित'चा तिसऱ्यांदा 'यू-टर्न'! शेंडगेंना केलं 'एप्रिल फूल', विशाल पाटलांना दिला पाठिंबा; आंबेडकरांच्या बदलत्या भूमिकेची चर्चा

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला आहे. अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांना समाजातील विविध घटकांकडून वाढता पाठिंबा मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीने विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला होता. याबाबतचे ट्विट वंचित आघाडीच्या ‘एक्स’ हॅंडलवरून करण्यात आले. वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले. आता ॲड. आंबेडकर यांची सभा होत आहे.

Sangli Lok Sabha
SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

या सभेसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. नागरिकांसाठी आसन व्यवस्था केली आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, माजी महापौर किशोर जामदार, माजी नगरसेवक सुरेश आवटी, संजय मेंढे, शैलजा पाटील, वहिदा नाईकवडी, अशोक कांबळे, वंचित आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ते सोमनाथ साळुंखे, जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, राजेश गायकवाड, संघटक नितीन सोनवणे, संपर्कप्रमुख नजीर झारी, युवा प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजित घाटे, जिल्हा महासचिव राजू मुलाणी, जिल्हा सदस्य अपर्णा वाघमारे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

Sangli Lok Sabha
Chikkodi Lok Sabha : 370 कलम हटवून मोदींनी देशातील दहशतवाद संपविला, 70 वर्षांत काँग्रेसनं काय केलं? अमित शहांचा सवाल

गवई आज सांगलीत

रिपब्लिकन पक्षाचे (गवई गट) नेते डॉ. राजेंद्र गवई आज (ता. ४) सांगलीत येत आहेत. सकाळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, विशाल पाटील यांच्या प्रचार फेरीत ते सहभागी होणार आहेत. सकाळी ११ वाजता त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.