Sangli Lok Sabha : 'राज्यभरात भाजपविरोधी लाट, सांगलीतही तेच चित्र असेल'; रोहित पाटलांचे सूचक विधान

राज्यभरात मतदारांमध्ये भाजपविरोधी (BJP) लाट असल्याचे चित्र दिसले.
Sangli Lok Sabha Sharad Pawar Group leader Rohit Patil
Sangli Lok Sabha Sharad Pawar Group leader Rohit Patil esakal
Updated on
Summary

आर. आर. पाटील (R. R. Patil) यांचे चिरंजीव रोहित पाटील (Rohit Patil) यांना राष्ट्रवादी काँग्रेसने (Sharad Pawar Group) स्टार प्रचारकांच्या यादीत या वेळी घेतले होते.

तासगाव : ‘‘राज्यात लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. एकूणच, राज्यभरात मतदारांमध्ये भाजपविरोधी (BJP) लाट असल्याचे चित्र दिसले,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) स्टार प्रचारक रोहित पाटील (Rohit Patil) यांनी पत्रकारांशी बोलताना केले. सांगलीतही (Sangli Lok Sabha Elections) तेच चित्र असेल, असेही ते म्हणाले.

आर. आर. पाटील (R. R. Patil) यांचे चिरंजीव रोहित पाटील (Rohit Patil) यांना राष्ट्रवादी काँग्रेसने (Sharad Pawar Group) स्टार प्रचारकांच्या यादीत या वेळी घेतले होते. राज्यातील निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापासून ते राज्यात वेगवेगळ्या मतदारसंघांत महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी फिरताना दिसले. वर्धा, दिंडोरी, शिरूर, बारामती, माढा, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, नाशिक या मतदारसंघांत त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या.

Sangli Lok Sabha Sharad Pawar Group leader Rohit Patil
गणपतीपुळे किनाऱ्यावरील स्टॉलधारकांना ग्रामपंचायतीची नोटीस; 'या' तारखेपासून स्टॉल बंद करण्याचे आदेश, काय आहे कारण?

सांगली लोकसभा मतदारसंघातही तासगाव येथेही महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित मेळाव्यासाठीही त्यांनी उपस्थिती लावली होती. प्रचारासाठी फिरताना आलेल्या अनुभवाबद्दल रोहित पाटील म्हणाले, ‘‘मतदारांमध्ये भाजपविरोधी लाट असल्याचे जाणवले. महागाई, बेरोजगारी, उद्योगधंदे, नोकऱ्या यांबाबत मतदार बोलत होते. महाविकास आघाडीने या मुद्द्यांना प्राधान्य दिले असल्याने मतदार महाविकास आघाडीच्या मागे उभे असल्याची चित्र सर्वत्र दिसले.’’

Sangli Lok Sabha Sharad Pawar Group leader Rohit Patil
धक्कादायक! हातकणंगलेतील 32 वर्षीय महिलेचा गर्भपात करताना मृत्यू; दाखल्यासाठी सांगलीत मृतदेह फिरवला अन्...

सांगली लोकसभा निवडणुकीत काय होणार, यावर उत्तर देताना, ‘‘राज्यात भाजप विरोधी लाट जाणवत होती. तसेच सांगलीमध्ये वातावरण असेल,’’ असे मिश्कीलपणे ते म्हणाले. सांगली लोकसभा मतदार संघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीचे काम केले नाही, या प्रश्नाला मात्र त्यांनी चार तारखेला याचे उत्तर मिळेल, असे सांगून प्रश्नाला पद्धतशीरपणे बगल दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.