Sangli Lok Sabha : सांगलीचा निर्णय झाला नाही, तोवरच 'सेना' घेऊन चंद्रहार पाटील उतरले मैदानात; काँग्रेसने वाद ताणला

महाविकास आघाडीतील उमेदवारीचा निर्णय अद्याप लटकलेला आहे.
Sangli Lok Sabha Shiv Sena Candidate Chandrahar Patil
Sangli Lok Sabha Shiv Sena Candidate Chandrahar Patil esakal
Updated on
Summary

चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली असतील तरी ते ‘महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार’ म्हणून अद्याप जाहीर झालेले नाहीत.

सांगली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मिरजेत उमेदवारी जाहीर केल्यानंतर चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांनी जिल्हाभरात भेटीगाठींना सुरवात केली आहे. महाविकास आघाडीतील उमेदवारीचा निर्णय अद्याप लटकलेला आहे. त्यामुळे काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून अद्याप चंद्रहार यांच्याशी संपर्क साधलेला नाही. राज्याचा निर्णय झाल्यानंतरच हे पक्ष भूमिका ठरवतील, तोवर ‘सेना’ घेऊन चंद्रहार मैदानात उतरले आहेत.

चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली असतील तरी ते ‘महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार’ म्हणून अद्याप जाहीर झालेले नाहीत. काँग्रेसने वाद ताणला आहे. दिल्लीपर्यंत चर्चा पोहोचल्या आहेत. त्यामुळे ठाकरेंकडून मिळालेला शब्द पूर्ण करून घेण्यात चंद्रहार यांना यश आले असले तरी महाविकास आघाडीतील घटक पक्षांची बेरीज हा कळीचा मुद्दा आहे.

Sangli Lok Sabha Shiv Sena Candidate Chandrahar Patil
ज्या महामानवानं भारताला संविधान दिलं, त्याच आंबेडकरांना दोन वेळा काँग्रेसकडून स्वीकारावा लागला पराभव!

तोवर जिल्हाभरातील विविध पक्षीय नेत्यांना भेटणे, आपली भूमिका सांगणे, शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा घेणे अशा पद्धतीने त्यांनी काम सुरू केले आहे. संख आणि तासगाव येथे शिवसेनेचे मेळावे झाले. चंद्रहार म्हणाले, ‘‘माझी शिवसेनेची उमेदवारी जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीकडून त्यावर शिक्कोमोर्तब झाल्यानंतर सगळे एकजुटीने आम्ही कामाला लागू. मी लोकांच्या भेटी घेत आहे. भूमिका सांगत आहे. शिवसैनिकांशी संवाद साधत आहे.’’

Sangli Lok Sabha Shiv Sena Candidate Chandrahar Patil
Satara Lok Sabha : उदयनराजेंना दिलेला 'शब्द' अमित शहा पाळणार? साताऱ्याच्या उमेदवारीवरून भाजप-राष्ट्रवादीत घमासान!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.