Sangli Lok Sabha : षड्‍यंत्र रचून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेचा घात केला; ठाकरे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप

शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांच्या विरोधात काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी केली.
Sangli Lok Sabha Shiv Sena Congress NCP
Sangli Lok Sabha Shiv Sena Congress NCPesakal
Updated on
Summary

लोकसभेला शिवसेनेची कोंडी केली गेली, त्याचा बदला आम्ही विधानसभेला घेऊ, असा इशारा संजय विभूते यांनी दिला.

सांगली : ‘‘सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) मतदारसंघामध्ये काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील बहुतांश नेत्यांनी आमचा घात केला. शिवसेना (Shiv Sena) ठाकरे पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात काम केले. शिवसेना सांगलीत वाढू नये, यासाठी षङ्‌यंत्र रचून काम झाले. या संपूर्ण स्थितीचा फोटोसह अहवाल आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवणार आहोत,’’ अशी भूमिका जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी मांडली.

Sangli Lok Sabha Shiv Sena Congress NCP
18 आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला; नेत्यांच्या कामगिरीवरच लोकसभेच्या उमेदवारांचं भवितव्य अवलंबून!

‘‘महाविकास आघाडी व शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांच्या विरोधात काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. काँग्रेसने या बंडाला बळ दिले, असा आरोप शिवसेना आधीपासून करत आली आहे. शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादीतील विविध नेते आणि गटांनी सेनेची साथ सोडली आणि वेगवेगळी भूमिका घेतली,’’ असा आरोपदेखील आता विभूते यांनी केला आहे.

विभूते म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीत एकदा शिवसेनेला जागा सुटली म्हटल्यानंतर सगळ्यांना एकत्र काम करायला हवे होते. तसे घडले नाही. बंडखोरी एकवेळ मान्य आहे, मात्र त्याविरोधात पक्षाने कारवाई केली नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस पक्ष विशाल पाटील यांच्या पाठीशी उभा राहिलेला दिसला. दुसरीकडे राष्ट्रवादीतील नेत्यांनी सोयीस्कर भूमिका घेतल्याचे आमच्या लक्षात आले आहे. रोहित पाटील यांनी तासगाव, कवठेमहांकाळमध्ये विशाल पाटील यांचे काम केले.

Sangli Lok Sabha Shiv Sena Congress NCP
'महायुतीचे उमेदवार नारायण राणे तीन ते साडेतीन लाखांच्या मताधिक्याने विजयी होतील'; नीतेश राणेंना विश्वास

आमदार अरुण लाड समर्थकांपैकी थोड्यांनी भाजपचे तर थोड्यांनी अपक्षाचे काम केले. आमदार जयंत पाटील यांच्या समर्थकांपैकी ४० टक्के कार्यकर्ते विशाल यांच्यासोबत, ३० टक्के लोक भाजपसोबत, तर ३० टक्के शिवसेनेसोबत दिसले. त्याचे फोटो आम्ही मिळवले आहेत, व्हिडिओ आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवकांच्या भूमिका पुराव्यानिशी एकत्र केल्या आहेत. ’’

Sangli Lok Sabha Shiv Sena Congress NCP
Sangli Lok Sabha : विशाल पाटलांवरील निलंबनाची कारवाई टाळली; शिवसेनेच्या दबावापुढे न झुकण्याची काँग्रेसने घेतली भूमिका!

‘विधानसभेला सर्वत्र बंड’

लोकसभेला शिवसेनेची कोंडी केली गेली, त्याचा बदला आम्ही विधानसभेला घेऊ, असा इशारा संजय विभूते यांनी दिला. ते म्हणाले, ‘‘विशाल पाटील यांच्या बंडाविरुद्ध काँग्रेसने कारवाई केली नाही. आम्ही विधानसभेला सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडी म्हणून काम करणार नाही. जागोजागी बंड करू. त्यावेळी शिवसैनिकांना ठाकरेंनी अभय द्यावे, अशी मागणी करू. सांगलीत शिवसेनेला एक जागा मिळेल, अन्य सात ठिकाणी आम्ही त्यांची तळी उचलणार नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.