खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटलांचा बळी दिला; विशाल पाटलांनी कोणावर केला गंभीर आरोप

संजयकाकांनी त्यांच्या दिलदार शत्रूसोबत बसून षड्‌यंत्र रचले. सांगलीत नुरा कुस्ती लावण्याचा पूर्ण प्रयत्न केला.
Sangli Lok Sabha Vishal Patil
Sangli Lok Sabha Vishal Patilesakal
Updated on
Summary

''चंद्रहार पाटील यांचा या डावात बळी दिला गेला. चंद्रहारबद्दल मला सहानुभूती आहे. एका शेतकऱ्याच्या मुलाचे नुकसान नको, असे मी म्हणालो होतो.''

सांगली : संजयकाकांनी त्यांच्या दिलदार शत्रूसोबत बसून षड्‌यंत्र रचले. सांगलीत नुरा कुस्ती लावण्याचा पूर्ण प्रयत्न केला; मात्र तो फसला. त्यामुळे मावळते खासदार आता वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यातून त्यांचा राग, अहंकार बाहेर येत आहे, अशी जोरदार टीका अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी पत्रकार परिषदेत केली. खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटील यांचा बळी दिला, असा टोलाही त्यांनी लगावला.

खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांच्या आरोपांना त्यांनी प्रत्युत्तर दिले. दोन ते अडीच लाख मतांनी माझा विजय होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘षड्‌यंत्र रचल्यानंतर खासदारांचा आत्मविश्‍वास वाढला, पाच-सात लाख मताने विजयी होऊ, असा आत्मविश्‍वास त्यांना होता. सांगलीतील जनतेने षड्‌यंत्र ओळखून मला उभे केले. तेव्हापासून खासदारांचा मूड खराब झाला. सांगलीत भाजप (BJP) कमकुवत झाली आहे. उमेदवारही कमजोर दिला. अशावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अपेक्षा ठेवली. त्यांच्या दिलदार शत्रूप्रमाणे इतरांनी मदत करावी, अशी अपेक्षा बाळगली. ते झाले नाही.

Sangli Lok Sabha Vishal Patil
'संजय पाटलांचं नशीब बदलणारा माई का लाल अद्याप जन्माला यायचाय'; भाजप खासदाराचा कोणाला इशारा?

त्यातूनच ते काँग्रेस नेत्यांवर टीका करताहेत. आमदार विश्‍वजित कदम (Vishwajeet Kadam) भावी मुख्यमंत्री, देशातील महत्त्‍वाचे नेते आहेत. त्यांनी भाजपला पराभूत करण्यासाठी काम केले. त्यांच्या पाठीशी दादाप्रेमी जनता उभी आहे. आमची एकी अभेद्य आहे. माझा दोस्त दिलदार आहे, ही दोस्ती आता तुटणार नाही. खासदार ज्यांना धमक्या देत आहेत, त्यांना मी आश्‍वस्त करतो मी तुमच्या पाठीशी आहे. विश्‍वजित तुमच्या अडचणीत धावून येतील.’’

ते म्हणाले, ‘‘चंद्रहार पाटील यांचा या डावात बळी दिला गेला. चंद्रहारबद्दल मला सहानुभूती आहे. एका शेतकऱ्याच्या मुलाचे नुकसान नको, असे मी म्हणालो होतो. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सर्वप्रथम ती भीती व्यक्त केली होती. पण, खासदारांच्या दिलदार शत्रूच्या चौकडीने ठरवून चंद्रहार यांचा वापर केला.’’ खासदारांकडे चांगले काही सांगण्यासारखे नसल्याने त्यांनी माझे फोटो व्हायरल केले, फेक न्यूज फिरवल्या, त्याविरोधात आम्ही तक्रार दाखल केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Sangli Lok Sabha Vishal Patil
Pollution Control Board : कोल्हापूर- इचलकरंजी महापालिकेला नोटीस, 'या' ग्रामपंचायतींचाही समावेश; काय आहे कारण?

ते कोणाच्या गाडीतून फिरले?

विश्‍वजित यांना आघाडीधर्म शिकवणाऱ्या संजयकाकांनी कधी युतीधर्म पाळला होता का? त्यांनी विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषदेला भाजपसोबत काय केले? महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते कुणाच्या गाडीतून फिरत होते, हे सगळ्यांना माहिती आहे, असा टोला विशाल पाटील यांनी हाणला. ते म्हणाले, ‘‘सांगलीतील षड्‌यंत्राचा कबुली जबाब त्यांनीच देऊन टाकला. कुणी षड्‌यंत्र रचले, त्यांना कुणी मदत केली, याची जनतेत कुजबूज होती, त्यावर शिक्कोमोर्तब झाले.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.