'यशवंत'ची 300 एकर जमीन 56 कोटींना विकून संजय पाटलांनी मालमत्ता कमावली; विशाल पाटलांचा गंभीर आरोप

कारखान्याची ३०० एकर जमीन ५६ कोटी रुपयांना विकून स्वत:ची मालमत्ता केली.
Sangli Lok Sabha Vishal Patil
Sangli Lok Sabha Vishal Patilesakal
Updated on
Summary

''संजय पाटील यांनी नेहमीच पाण्याचे राजकारण केले. अनेकदा पाणी अडवून स्वार्थ साधला.''

सांगली : ‘‘खानापूर (Khanapur) तालुक्यातील जनतेचा यशवंत कारखाना (Yashwant Factory) संजय पाटील (Sanjay Patil) यांनी विकला. हा कारखाना उभारण्यासाठी दिवंगत संपतराव माने यांनी वसंतदादांचा विरोधही पत्करला. कारखान्याची ३०० एकर जमीन ५६ कोटी रुपयांना विकून स्वत:ची मालमत्ता केली. आणखी २०० एकर जमीन वैयक्तिक नावावर ठेवली आहे. ही गायरान जमीन सोडविण्यासाठी संजय पाटील यांना खासदार व्हायचं आहे. शासनाचा, सत्तेचा वापर करून ते गडगंज झाले. जनतेच्या मालमत्तेवर त्यांचा डोळा आहे,’’ अशी घणाघाती टीका अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी केली.

Sangli Lok Sabha Vishal Patil
Satara Lok Sabha : 'साताऱ्याचा खासदार शशिकांत शिंदेच होणार, ही काळ्या दगडावरची रेघ'; जयंत पाटलांना विश्वास

खानापूर तालुक्यातील भाळवणी, मंगरूळ, चिंचणी, बामणी, कार्वे, आळसंद, गार्डी, घानवड, हिंगणगादे, नागेवाडी, चिखलहोळ, माहुली, लेंगरे, खानापूर आदी ठिकाणी प्रचार मेळावे झाले, त्या वेळी ते बोलत होते. सुशांत देवकर, पद्मसिंह पाटील, राजकुमार माने, माजी नगराध्यक्ष अलीबाबा पिरजादे, माजी नगरसेवक हर्षल तोडकर, भाऊसाहेब मंडले, विराज माने, संभाजी जाधव, डॉ. विजय मुळीक, आनंदराव पाटील, चंद्रकांत जाधव, इंदूमती जाधव, प्रवीण जाधव, अभिषेक शिंदे, उदय थोरात व कार्यकर्ते उपस्थित होते.

अपक्ष उमेदवार विशाल पाटील म्हणाले, ‘‘संजय पाटील यांनी नेहमीच पाण्याचे राजकारण केले. अनेकदा पाणी अडवून स्वार्थ साधला. खानापूर, घाटमाथ्यावरील जनतेशी काहीही देणेघेणे आहे. अशा व्यक्तीला निवडून दिल्याने जिल्हा दहा वर्षे मागे गेला आहे. दिल्लीत बसून सांगली जिल्ह्याचे प्रश्न संसदेत मांडणारा खासदार हवा. मराठा, धनगर आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे.

Sangli Lok Sabha Vishal Patil
'सर्व मित्रपक्षांची ताकद मजबूत, कोल्हापुरात लोकसभेला 2-0 असा गोल होईल'; खासदार शिंदेंना विश्वास

देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षणाची ग्वाही दिली. गतवेळी धनगर समाजाची मते आमच्या मागे जाऊ नये, यासाठी उमेदवार उभे केला. मराठा आरक्षणाचे आश्वासन दिले, पण तेही पूर्ण केले नाही. खासदार कुठे होते? संसदेत त्यांनी मराठा, धनगर आरक्षणाचा प्रश्न मांडला नाही.’’

Sangli Lok Sabha Vishal Patil
Raigad Lok Sabha : 'अंदरकी बात है, तीन एमएलए मेरे साथ है।' रायगडचे तीन आमदार वंचितच्या संपर्कात?

‘रडणार नाही; लढणार’

विशाल पाटील म्हणाले,‘‘वसंतदादांचे निधन होऊन ३५ वर्षे झाली, तरी जनता वसंतदादा घराण्यावर प्रेम करते, हे पाहून मन भरून आले. जनतेच्या प्रेमाच्या जाणीव आहे. वसंतदादा घराण्यात जन्मलो असल्याने एक-दोन शत्रूही असणार. माझ्या संस्था अडचणीत आणण्याचा प्रयत्न होणार, संघर्ष करावा लागणार याची जाणीव आहे. मी रडणारा नाही, तर लढणारा कार्यकर्ता आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.