Sanjay Daine: मानलं साहेब! वडिलांवर अंत्यसंस्कार करून जिल्हाधिकारी कर्तव्यावर

Gadchiroli District Collector: वडिलांच्या निधनाचे दु:ख बाजूला ठेवत त्यांचे अंत्यसंस्कार पूर्ण करून ते १७ एप्रिल रोजी निवडणुकीच्या कर्तव्यावर हजर झाले.
Sanjay Daine Gadchiroli District Collector
Sanjay Daine Gadchiroli District CollectorEsakal
Updated on

गडचिरोली: गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात कडेकोट पोलिस बंदोबस्तात शुक्रवारी (ता. १९) मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र, १३ गावांसाठी कोटमी गावात एकमेव मतदान केंद्र असल्याने अनेकांना पायी तर काहींना ट्रॅक्टर साहाय्याने केंद्र गाठावे लागले.

स्थानिक मतदारांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक अशाच प्रकारे मतदानासाठी येत आहेत. मतदानासाठी मूलभूत सुविधा न दिल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली. ‘सकाळ’च्या बातमीदाराने जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांचा आढावा घेतला. यात ही बाब आढळून आली.

एटापल्ली तालुक्यातील कोटमी हे गाव घनदाट जंगलात आणि डोंगराळ भागात वसलेले आहे. या गावातील जिल्हा परिषद शाळेत जिल्हा निवडणूक विभागाने मतदान केंद्र आहे.कोटमी, नैनगुडा, अडांगे, कोटमी क्र. १, आसवंडी, झुरी, कोंडवाही, इटावाही, नवेगाव, वसमतटोला, पायडी, गदेरी, इरफागट्टा आणि बिद्री आदी गावांमधील नागरिकांना मतदानासाठी हेच केंद्र देण्यात आले.

या सर्व गावांपासून कोटमी मतदान केंद्राचे अंतर पाच किलोमीटरहून अधिक आहे. जिल्हा निवडणूक विभागाच्या नियोजनानुसार लांब पल्ल्याच्या गावांतील लोकांना ये-जा करण्यासाठी एसटी बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, वरील सर्व गावातील लोकांनी शुक्रवारी पायी प्रवास करून मतदान केले. काही गावांच्या ग्रामसभांनी त्यांच्या स्तरावर ट्रॅक्टरची सुविधा उपलब्ध करून दिली. या केंद्रावर १ हजार ३८४ जणांचे मतदान होते.

Sanjay Daine Gadchiroli District Collector
Jalgaon Lok Sabha Constituency : उमेदवार बदलाचा सस्पेन्स संपल्यात जमा; आता ‘रिस्क’ घेणे अशक्य

वडिलांवर अंत्यसंस्कार करून जिल्हाधिकारी कर्तव्यावर

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विक्रमी संख्येने मतदारांना आवाहन केले होते.

दरम्यान, दैने यांच्या वडिलांचे १५ एप्रिल रोजी निधन झाले. वडिलांच्या निधनाचे दु:ख बाजूला ठेवत त्यांचे अंत्यसंस्कार पूर्ण करून ते १७ एप्रिल रोजी निवडणुकीच्या कर्तव्यावर हजर झाले. त्यांनी शुक्रवारी गडचिरोलीत मतदानाचे कर्तव्य पार पाडत वडिलांना श्रद्धांजली अर्पण केल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

Sanjay Daine Gadchiroli District Collector
Lok Sabha Election Voting : उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात ‘इंडिया’आघाडीचे पारडे जड? अशी बदलली समीकरणे

सुरपाम यांनी महत्त्वाची भूमिका

कोटमी परिसर आदिवासीबहुल आहे. येथील वृद्ध महिलांना अजूनही मराठी भाषेचे ज्ञान नाही. गोंडी भाषा ही त्यांची मुख्य बोलीभाषा आहे. अशा स्थितीत मतदान केंद्रावर आलेल्या बहुतांश महिलांना काय करावे हेच कळत नव्हते. ही बाब लक्षात घेत कोटमी केंद्राचे प्रादेशिक अधिकारी आणि सिरोंचाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर सुरपाम यांनी सर्व मतदारांना गोंडी भाषेत मशिन आणि व्हीव्हीपॅटची माहिती दिली आणि लोकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.