Satej Patil on Sanjay Mandalik : "मंडलिकांना भाजपच्या नेत्यांनी जाब विचारावा अन्..."; शाहू महाराजांवर टीकेनंतर सतेज पाटलांचा इशारा

मंडलिकांनी आपलं वक्तव्य तातडीनं मागं घेऊन तात्काळ माफी मागावी अशी मागणीही यावेळी सतेज पाटील यांनी केली.
satej patil, Sanjay Mandlik
satej patil, Sanjay MandlikEsakal
Updated on

कोल्हापूर : संजय मंडलिक यांनी छत्रपतींच्या घराण्याचा अपमान केला असून हे कदापि सहन केलं जाणार नाही. त्यांना कोल्हापुरकर मतपेटीतूनच उत्तर देतील. तसेच मंडलिकांना छ्त्रपतींच्या घराण्यावर अशी वैयक्तिक पातळीवर टीका करण्यासाठी कोणी सांगितलं याचा महायुतीतील लोकांनी शोध घ्यावा आणि मंडलिकांना त्यांनी याचा जाब विचारावा, अशी मागणी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी केला आहे. (Sanjay Mandalik should be asked for answers on their statement about shahu maharaj says Satej Patil)

satej patil, Sanjay Mandlik
Mercenary Spyware: आयफोन युजर्स सावधान! पेगासिस सारखा आला नवा स्पायवेअर; अ‍ॅपलनं काय म्हटलंय वाचा?

....अन्यथा कोल्हापुरी भाषेत उत्तर देऊ - पाटील

संजय मंडलिकांच्या शाहू छ्त्रपती यांच्यावरील टीकेनंतर सतेज पाटील माध्यमांशी बोलताना आक्रमक झाले होते. त्यांनी म्हटलं की, "मंडलिकांचं अशा पद्धतीचं अपमानास्पद वक्तव्य कधीही सहन करणार केलं जाणार नाही. (Marathi Tajya Batmya)

या निवडणुकीची सुरुवात झाली त्यावेळी चंद्रकांत दादा, हसन मुश्रीफ यांनी जाहीररित्या सांगितलं होतं की, शाहू महाराजांबद्दल वैयक्तिक टीका करणार नाही. अशा सूचना देऊनही संजय मंडलिक आज आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी निवडणुकीत लाखाच्या पुढे लीड वाढत चालल्यानं त्यांनी अशा पद्धतीचं विधान केलं आहे. पण कोल्हापुरकर हे कदापि सहन करणार नाहीत याचा निषेध आम्ही करतो. त्यांनी आपलं वक्तव्य त्वरीत मागे घेऊन माफी मागावी. त्याचे परिणाम त्यांना निवडणुकीत भोगावे लागतील.

satej patil, Sanjay Mandlik
Sanjay Mandalik: "आत्ताचे महाराज खरे वारसदार नाहीत, ते दत्तकच..."; संजय मंडलिक यांचं वादग्रस्त विधान

संजय मंडलिकांच्या नेत्यांनी त्यांना जाब विचारला पाहिजे. त्यांना कोणी चिठ्ठी लिहून दिली होती का? हे पहावं, आम्ही स्पष्टपणे कोल्हापुरी भाषेत उत्तरं द्यायची वेळ आली तर देऊ. त्यामुळं याचे पडसाद कोल्हापुरातच नाही तर महाराष्ट्रात उमटतील. प्रवीण दरेकरांनी मंडलिकांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करु नये, त्यांनी माफी मागावी. छत्रपती घराण्याचा अपमान त्यांनी केला आहे. या अपमानाचा निषेध कोल्हापुरकर म्हणून आम्ही करतो, असंही सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

satej patil, Sanjay Mandlik
Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास उद्यापासून सुरुवात; महाराष्ट्रातील 11 जागांचा समावेश

संजय मंडलिकांनी काय केली होती टीका?

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून संजय मंडलिक हे उमेदवार आहेत तर महाविकास आघाडीकडून शाहू महाराज हे उमेदवार आहेत. त्यामुळं मंडलिक यांनी प्रतिस्पर्धी म्हणून शाहू महाराजांवर टीका केली.

ही टीका करताना त्यांनी म्हटलं की, "आत्ता जे महाराज आहेत ते कोल्हापुरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत ते सुद्धा दत्तकच आहेत. त्यामुळं तुम्ही, आम्ही आणि कोल्हापुरची जनता ही खरी वारसदार आहे. माझे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी खऱ्या अर्थानं पुरोगामी विचार जपला. मल्लाला हातंच मारायचं नाही, अन् टांगली मरायची नाही मग कुस्ती कशी होणार" मंडलिकांच्या या विधानामुळं राजकीय टिका-टिप्पणीला सुरुवात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.