नवी दिल्ली : येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील त्यातील काही विलिनही होतील असं विधान शरद पवार यांनी नुकतंच एका मुलाखती दरम्यान केलं होतं. त्यांच्या या विधानावर आता शिवसेना नेते संजय निरुपम यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. (Sanjay Nirupan sensational claim on Sharad Pawar statement of many regional parties will merge in Congress)
निरुपम यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं की, शरद पवारांचं मुलाखतीतून एक विधान समोर आलं यात त्यांनी एक इशारा दिला आहे की, अनेक प्रादेशिक पक्ष येणाऱ्या काळात काँग्रेसमध्ये विलीन होऊन जातील. या त्यांच्या भविष्यवाणीमागं त्यांची एक योजना आहे. मी याचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे कारण, यापूर्वी अनेकदा त्यांनी अशा प्रकाराचा प्रयत्न केला होता. काँग्रेस पक्षात राष्ट्रवादीचं विलिनिकरण व्हावं, अशी त्यांची इच्छा होती. तसेच दिग्विजय सिंह यांनी तर अधिकृतरित्या विधानही केलं होतं की, शरद पवारांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करावा.
शरद पवारांनी तसा प्रस्तावही काँग्रेसच्या नेतृत्वासमोर ठेवला होता. पण यामध्ये त्यांनी एक अट ठेवली होती ती म्हणजे त्यांच्या मुलीकडं म्हणजे सुप्रिया सुळेंकडं महाराष्ट्र काँग्रेसची जबाबदारी सोपवण्यात यावी. पण त्यांची ही अट मान्य करायला काँग्रेस पक्ष तयार नव्हता. त्यामुळं राष्ट्रवादीचा काँग्रेसमध्ये विलिनिकरणाचा हा कार्यक्रम अद्याप प्रलंबित आहे. (Latest Marathi News)
पण आज जी बदललेली परिस्थिती आहे, त्यामध्ये त्यांचा पक्ष वाईटरित्या फुटला आहे. त्यामुळं असं वाटतंय की, बारामती त्यांच्या हातातून निसटत आहे, त्यामुळं आपल्या मुलीचं पुनर्वसन करण्यासाठी ते अशा प्रकारचा कार्यक्रम आखत आहेत. पण या विलिनिकरणातून काँग्रेसलाच काय शरद पवारांनाही काही फायदा होईल असं मला वाटत नाही. (Marathi Tajya Batmya)
कारण हे दोन्ही पक्ष तोट्यात चालणाऱ्या कंपन्या आहेत. त्यामुळं दोन शून्य भेटल्यानं मोठा शून्यच तयार होणारेय. पण तरीही त्यांची काहीतरी धडपड सुरुच आहे, अशा शब्दांत निरुपम यांनी शरद पवारांच्या विधानावर भाष्य केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.