Sangli Lok Sabha : संजय पाटील, विशाल पाटील कोट्यधीश; 'मविआ'चे उमेदवार चंद्रहार पाटलांची किती आहे संपत्ती?

सांगली मतदारसंघात (Sangli Lok Sabha) लढत असलेल्या प्रमुख तीन उमेदवारांची संपत्ती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर झाली आहे.
Sangli Lok Sabha
Sangli Lok Sabhaesakal
Updated on
Summary

खासदार संजय पाटील (Sanjay Patil) सर्वांत श्रीमंत असून अपक्ष विशाल पाटील (Vishal Patil) यांची संपत्तीही कोट्यवधींची आहे.

सांगली : राजकारण हे काही गरिबाचं काम नाही, असं म्हटलं जातं...अर्थात, उमेदवारी अर्ज दाखल करताना श्रीमंत-गरीब हा भेदभाव अजिबात असत नाही. निवडणूक उभी करायला, लढायला ‘व्हिटॅमिन एम’ (Vitamin M) लागतं, असं गमतीनं म्हटलं जातं...गंमत कसली; वास्तवच आहे. मतदारांचे लक्ष उमेदवारांच्या संपत्तीकडे लागलेले असते.

सांगली मतदारसंघात (Sangli Lok Sabha) लढत असलेल्या प्रमुख तीन उमेदवारांची संपत्ती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर झाली आहे. त्यानुसार, खासदार संजय पाटील (Sanjay Patil) सर्वांत श्रीमंत असून अपक्ष विशाल पाटील (Vishal Patil) यांची संपत्तीही कोट्यवधींची आहे. शेतकऱ्याचा (Farmers) मुलगा म्हणून मैदानात उतरलेल्या डबल महाराष्ट्र केसरींची संपत्ती दीड कोटींवर दाखवली आहे.

Sangli Lok Sabha
Kolhapur Lok Sabha : कुणाच्या तरी पराभवासाठी 'ते' माझ्यासोबत आले; गौप्यस्फोट करत मंडलिक सतेज पाटलांबद्दल काय म्हणाले?

संजय पाटील यांची संपत्ती ४८ कोटींची

खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांची संपत्ती ४८ कोटी ३१ लाख ३९ हजार रुपये आहे. त्यांनी ‘महिला सन्मान योजना’ आधी आपल्या घरीच राबवल्याचे त्यांच्या प्रतिज्ञा पत्रातून लक्षात येते. त्यांच्या पत्नी ज्योती पाटील यांच्या नावे त्यांच्याहून अधिक संपत्ती आहे. जंगम मालमत्ता ३० कोटी ५० लाखांनी अधिक आहे. जंगमपैकी ३२ कोटी ३१ लाख रुपये असुरक्षित कर्ज म्हणून एसजीझेड अँड एसजी शुगर्स कंपनी (तासगाव कारखाना) ला दिलेत. त्यांची सन २०१९ रोजी १९ कोटी ११ लाख रुपये संपत्ती होती. २ कोटी ३३ लाख कर्ज होते.

जंगम मालमत्ता २ कोटी ४८ लाख रुपये, स्थावर मालमत्ता ४५ कोटी ८२ लाख रुपये दाखवली आहे. व्यवसाय व शेती हे उत्पन्नाचे स्रोत दाखवले आहेत. ५३ कोटी २ लाखांची कर्जे आहेत. त्यांची मालमत्ता २९ कोटी रुपयांनी तर कर्ज ५१ कोटी रुपयांनी वाढले. त्यांच्याकडे दहा लाखांचे सोने व पत्नीकडे २४ लाखांचे सोने आहे. त्यांच्या नावे कोणतीही गाडी नोंद नाही.

Sangli Lok Sabha
'लोकसभे'त सात कुटुंबांचेच वर्चस्व! 1977 पासूनचा इतिहास; कोल्हापुरातून गायकवाड-मंडलिक सर्वाधिक वेळा खासदार

विशाल पाटील ३० कोटींचे मालक

अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची संपत्ती ३० कोटी ५२ लाखांवर आहे. गेल्या निवडणुकीत दाखवलेल्या संपत्तीच्या तुलनेत त्यात ८ कोटी ८० लाख रुपयांची वाढ झाली आहे. त्यांच्या नावावर २६ कोटी ७४ लाख ९३ हजार रुपये, तर पत्नी पूजा पाटील यांच्या नावावर ३ कोटी ७७ लाख ४८ हजार रुपयांची संपत्ती आहे. जंगम व त्यावर मालमत्तेचा समावेश आहे. विशाल यांच्याकडे १० कोटी ५९ लाख १३ हजारांची जंगम, तर १६ कोटी १५ लाख ७९ हजारांची स्थावर मालमत्ता आहे.

पत्नी पूजा यांच्या नावे ३ कोटी ३ लाख ७३ हजारांची जंगम, तर ७३ लाख ७५ हजारांची स्थावर मालमत्ता आहे. विशाल यांच्या नावे असलेल्या कर्जाचा भार थोडा कमी झाला आहे. त्यांच्यावर सन २०१९ मध्ये १० कोटी ३० लाख ६२ हजारांचे कर्ज होते. आता ७ कोटी ६५ लाख आहे. पूजा यांच्या नावे ६१ लाख ७६ हजारांचे कर्ज आहे. पाच वर्षांत २ कोटी ६५ लाखांनी भार कमी झाला.

Sangli Lok Sabha
राष्ट्रवादीच्या जगतापांचे बंड शमले; शरद पवार, जयंत पाटलांनी काढली समजूत, माढ्यात देणार मोहिते-पाटलांना साथ

चंद्रहार पाटील यांच्याकडे ४७ लाखांची मोटार

शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मैदानात उतरलेल्या चंद्रहार पाटील यांनी संपत्ती जाहीर केली आहे. ती एक कोटी ८० लाख २३ हजार आहे. स्वतः खरेदी केलेली जमीन व अन्य मालमत्तेची किंमत १ कोटी ६६ लाख आहे. बँका व अन्य संस्थांची ४ कोटी ५८ लाख रुपयांची कर्जे आहेत. बैलगाडी शर्यत, कुस्ती मैदाने, रक्तदान शिबिरामुळे ते चर्चेत आले. बैलगाडी शर्यतीत जिंकणाऱ्यांना दोन थार गाड्या भेट दिल्याने राज्यभर चर्चा झाली.

चंद्रहार यांच्याकडे रोख शिल्लक २ लाख ४० हजार रुपये, पत्नी दिव्या यांच्या हाती १ लाख २५ हजार रुपये शिल्लक आहेत. चंद्रहार ४७ लाख रुपये किमतीची मोटार वापरतात. ९ लाख ५८ हजारांचे सोने, ४ लाख ३५ हजारांची चांदी आहे. शासनाच्या क्रीडा विभागाकडून सहा हजार रुपये मासिक मानधन मिळते. त्यांच्याकडे स्वतःची शेतजमीन, काही प्लॉट आहेत. आंबेगाव, भाळवणी, पाटण व गोजेगाव येथे शेतजमीन व प्लॉट असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.