खासदार पाटील यांनी सातारा लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतच जाहीर केले. मात्र, त्यांचा हा निर्णय त्यांना मानणाऱ्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना पटलेला नाही.
कऱ्हाड : सातारा लोकसभा मतदारसंघाचे (Satara Lok Sabha Constituency) राष्ट्रवादी कॉँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil) यांनी लोकसभेच्या रणांगणातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे खासदार शरद पवार (Sharad Pawar) गटाचे उमेदवार कोण? याबाबत अनेक नावे चर्चेत आहेत.
मात्र, खासदार पाटील यांनीच सातारा लोकसभेची उमेदवारी घ्यावी, यासाठी आज त्यांना मानणाऱ्या जिल्ह्यातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयात भेटून त्यांना आग्रह केला. अनेकांनी फोनवरूनही खासदार पाटील यांना आग्रह करून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, खासदार पाटील यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही.
सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार शरदचंद्र पवार गटाची बैठक काल साताऱ्यात झाली. त्यामध्ये स्वतः खासदार पवार यांनी जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय त्या-त्या तालुक्यातील नेत्यांची मते जाणून घेतली. त्याचबरोबर इंडिया आघाडीतील इतर पक्षांच्या जिल्ह्यातील नेत्यांचीही त्यांनी चर्चा केली. त्यामध्ये खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीचे कारण पुढे करत लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे.
खासदार श्रीनिवास पाटील यांनी सातारा लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतच जाहीर केले. मात्र, त्यांचा हा निर्णय त्यांना मानणाऱ्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना पटलेला नाही. आज अनेक कार्यकर्त्यांनी त्याच्या कार्यालयात जाऊन त्यांनी उमेदवारी घ्यावी, अशी मनधरणी केली. मात्र, खासदार पाटील यांनी त्याबाबत कोणीतीही उघड भूमिका जाहीर केली नाही. उमेदवारीच्या निर्णयाबाबत खासदार पाटील यांनी सध्यातरी मौनच ठेवले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.