उदयनराजेंनी घेतली अजितदादा गटातील 'या' बड्या नेत्याची भेट; दोघांत बंद दाराआड चर्चा, भेटीमुळे जिल्ह्यात खळबळ

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यात प्रतिष्ठेची लढत होत आहे.
Satara Lok Sabha Mahayuti candidate Udayanraje Bhosale
Satara Lok Sabha Mahayuti candidate Udayanraje Bhosaleesakal
Updated on
Summary

सातारा लोकसभेच्या मैदानात हायव्होल्टेज लढत होत असून, अशातच उदयनराजे, रामराजेंची ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

सातारा : महायुतीचे सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) व फलटणचे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) यांची काल साताऱ्यातील प्रीती हॉटेलवर भेट झाली. या वेळी दोघांनी बंद दाराआड लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात अर्धा तास चर्चा केली. या भेटीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, रामराजेंचा सातारा लोकसभा मतदारसंघातील गट उदयनराजेंसोबतच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

सातारा लोकसभा (Satara Lok Sabha) मतदारसंघात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यात प्रतिष्ठेची लढत होत आहे. दोघांनीही पायाला भिंगरी लावून प्रचार सुरू केला आहे. दोघांनीही प्रत्यक्ष गाठीभेटीवर जोर दिला असून, सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्याही दोघेही गाठीभेटी घेत असल्याने जनतेत मात्र, संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Satara Lok Sabha Mahayuti candidate Udayanraje Bhosale
राष्ट्रवादीच्या जगतापांचे बंड शमले; शरद पवार, जयंत पाटलांनी काढली समजूत, माढ्यात देणार मोहिते-पाटलांना साथ

या पार्श्वभूमीवर काल (शुक्रवार) खासदार उदयनराजे भोसले हे हॉटेल प्रीती येथे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांची भेट घेण्यासाठी आले होते. या वेळी तेथे आधीच अजित पवार यांच्या गटाचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर उपस्थित होते. या वेळी उदयनराजे व रामराजेंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी माजी आमदार घार्गे, सुनील काटकर, मनोज घोरपडे, वसंतराव मानकुमरे, ज्ञानदेव रांजणे उपस्थित होते. दोन्ही नेत्यांत सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेवेळी प्रभाकर घार्गे व मनोज घोरपडे उपस्थित होते. दोन्ही नेत्यांत सातारा लोकसभेबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Satara Lok Sabha Mahayuti candidate Udayanraje Bhosale
Sangli Lok Sabha : संजय पाटील, विशाल पाटील कोट्यधीश; 'मविआ'चे उमेदवार चंद्रहार पाटलांची किती आहे संपत्ती?

रामराजे व उदयनराजेंचे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच सूर जुळलेले आहेत. त्यामुळे या भेटीमुळे या निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघातील रामराजेंचा गट हा उदयनराजेंसोबतच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. रामराजेंनी उदयनराजेंना निवडणुकीच्या शुभेच्छा दिल्या. यासंदर्भात रामराजे निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अधिक बोलणे टाळले. सातारा लोकसभेच्या मैदानात हायव्होल्टेज लढत होत असून, अशातच उदयनराजे, रामराजेंची ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()