Satara Lok Sabha : कऱ्हाडच्या दोन्ही आमदारांची दिलजमाई; मतभेद विसरून पृथ्वीराज चव्हाण-बाळासाहेब पाटील आले एकत्र

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीमुळे आमदार पाटील व अॅड. उंडाळकर गटात दरी पडली.
Satara Lok Sabha Prithviraj Chavan Balasaheb Patil
Satara Lok Sabha Prithviraj Chavan Balasaheb Patilesakal
Updated on
Summary

सहकारी संस्थांच्या निवडणुकीतूनच आमदार पाटील आणि अॅड. उदयसिंह उंडाळकर गटाबरोबरचे संबंध ताणले आहेत.

Satara Lok Sabha : जिल्हा बॅंक, शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) व माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांच्या गटातील संबंध ताणले गेले. निवडणुकीत दोन्ही नेत्यांनी परस्पर विरोधी भूमिका घेतल्या. कऱ्हाडसाठी महत्त्वाच्या असलेल्या बाजार समिती निवडणुकीत दोन्ही गट आमने-सामने आल्याने त्यांच्यातील दरी वाढत गेली होती.

मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जातीयवादी पक्षाला रोखण्यासाठी दोन्ही नेत्यांनी आपसांतील मतभेद विसरून पुन्हा एका नव्या उमेदीने हातात हात घालून काम करण्याचा निर्धार करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे दोन्ही गटांत पुन्हा दिलजमाई झाल्याचा सुखद अनुभव कार्यकर्त्यांना येत आहे.

Satara Lok Sabha Prithviraj Chavan Balasaheb Patil
Kolhapur MNS : 18 वर्षे झाली तरी, मनसेची अस्तित्वासाठीच लढा; स्थानिक पातळीवर ताकदीच्या नेतृत्वाची गरज!

माजी मंत्री (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर यांचा जिल्हा बँकेतील निवडणुकीत सोसायटी गटातून कायम उमेदवारी राहिली होती. त्याच गटातून जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत तत्कालीन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी लढण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी (कै.) उंडाळकरांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर (Uday Singh Patil-Undalkar) यांना उमेदवारी डावलण्यात आली. त्यामुळे त्यांनीही सोसायटी गटातूनच आमदार पाटील यांच्याविरोधात दंड थोपटले.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीमुळे आमदार पाटील व अॅड. उंडाळकर गटात दरी पडली. कऱ्हाड दक्षिणेत आमदार चव्हाण, उंडाळकर गटाचे विरोधक अतुल भोसले यांनी आमदार पाटील यांना मदत केली. त्यामुळे तालुक्यात आमदार पाटील व भोसले गटाचे नवे राजकीय समीकरण तयार झाले. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीनंतर तालुक्यातील १०० वर सोसायट्यांच्या निवडणुकीतही परिणाम दिसून आले.

Satara Lok Sabha Prithviraj Chavan Balasaheb Patil
Hatkanangle Lok Sabha : 'चिन्हात' अडकला पाठिंब्याचा निर्णय; 'स्वाभिमानी'च्या राजू शेट्टींची कोंडी, 'मशाल'वर शिवसेना ठाम

जिल्हा बॅंकेनंतर शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली. अॅड. उंडाळकर यांच्या ताब्यात असलेल्या बाजार समितीच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी आमदार पाटील यांनी अॅड. उंडाळकरांचा विरोधी गट असलेल्या अतुल भोसलेंशी जवळीक साधली. त्या निवडणुकीत आमदार पाटील यांच्याबरोबर भोसले गट असल्याने अॅड. उंडाळकरांना साथ देण्यासाठी आमदार चव्हाण हे रणांगणात उतरले. त्या निवडणुकीत अॅड. उंडाळकर व आमदार चव्हाण गटाच्या पॅनेलने विजय मिळवून बाजार समितीची सत्ता कायम राखली. मात्र, त्या निवडणुकीमुळे आमदार चव्हाण व आमदार पाटील गटातील दुरावा वाढला.

सध्या लोकसभा निवडणुकीचे धूमशान सुरू आहे. त्यासाठी महाविकास आघाडीतील कॉँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व अन्य घटक पक्ष या निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. जातीयवादी पक्षाला रोखण्यासाठी महाआघाडी कटिबद्ध असल्याचे संबंधित आघाडीतील नेत्यांनी जाहीर केले आहे. त्याअंतर्गत सध्या आमदार चव्हाण व आमदार पाटील हे मतभेद विसरून मोठ्या कालावधीनंतर एकत्र आले आहेत. आमदार चव्हाण यांनी ही सहकारी संस्थांची निवडणूक नसून देशाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. त्यासाठी सर्व जण मतभेद विसरून एकत्र आलो आहोत, असे जाहीर केले आहे. लोकसभेच्या निमित्ताने का होईना, कऱ्हाड दक्षिण- उत्तरचे आमदार पुन्हा एकत्र आले, याचे समाधान त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांना आहे.

Satara Lok Sabha Prithviraj Chavan Balasaheb Patil
Madhu Dandavate : ..तर एक मराठी माणूस पंतप्रधान झाला असता; पक्षाचे अध्यक्ष असूनही त्यांनी 'तसं' केलं नाही!

उंडाळकर गटही महाआघाडीसोबत...

माजी मंत्री (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर यांनी रयत संघटनेच्या माध्यमातून त्यांचा गट निर्माण केला आहे. उंडाळकर गटाची तालुक्यातील सहकारी संस्थांवर पकड होती. सहकारी संस्थांच्या निवडणुकीतूनच आमदार पाटील आणि अॅड. उदयसिंह उंडाळकर गटाबरोबरचे संबंध ताणले आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीसाठी अॅड. उंडाळकर हे महाआघाडीसोबत आहेत. ते दोन दिवसांपूर्वी झालेल्या महाआघाडीच्या नेत्यांच्या संवाद मेळाव्याला उपस्थित नव्हते. मात्र, त्यापूर्वी त्यांच्या उपस्थितीत महाआघाडीच्या नेत्यांची बैठकही झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.