Satara Lok Sabha : 'मोदींची लाट सुनामीसारखी, लाटेत शरद पवारांचे सर्व उमेदवार पराभूत होणार'; बावनकुळेंना विश्वास

खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांची अवस्‍था पहिल्यांदा इतकी केविलवाणी झाली आहे.
Satara Lok Sabha Sharad Pawar vs Chandrashekhar Bawankule
Satara Lok Sabha Sharad Pawar vs Chandrashekhar Bawankuleesakal
Updated on
Summary

‘‘मोदींची (Narendra Modi) २०१९ प्रमाणेच यावेळेसही सुप्त लाट आहे. ही लाट शरद पवारांच्या सर्व उमेदवारांना हरविल्याशिवाय राहणार नाही.''

सातारा : खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांची अवस्‍था पहिल्यांदा इतकी केविलवाणी झाली आहे. ४५ वर्षे सत्ता असून, त्यांना बारामतीत घरोघरी फिरावे लागत आहे. सध्या मोदींची सुप्त लाट असून, ही लाट सुनामीसारखी आहे. या लाटेत शरद पवारांचे सर्व उमेदवार पराभूत होतील, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केला.

दरम्यान, शशिकांत शिंदेंवर (Shashikant Shinde) फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले असून, ते त्यांना मान्य नाहीत, यावरून श्री. पवार यांनी त्यांना भ्रष्टाचार करण्याचे प्रमाणपत्र दिले आहे का? असा सवालही श्री. बावनकुळे यांनी उपस्थित केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्‍या वेळी त्यांनी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांच्यासमवेत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आदी उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, ‘‘मोदींची (Narendra Modi) २०१९ प्रमाणेच यावेळेसही सुप्त लाट आहे. ही लाट शरद पवारांच्या सर्व उमेदवारांना हरविल्याशिवाय राहणार नाही. देशाचे पंतप्रधान कोण हे साताऱ्यातील कोणत्याही व्यक्तीला विचारले तर मोदींचेच नाव येत आहे. इंडिया आघाडीकडे तर पंतप्रधान पदाचा उमेदवारही नाही. मोदींनी देशाचा गौरव संपूर्ण विश्वात केला आहे आणि निवडणुकीनंतर शरद पवार गट शून्‍य होणार आहे.’’

Satara Lok Sabha Sharad Pawar vs Chandrashekhar Bawankule
Kolhapur Lok Sabha : धर्माच्या नावाखाली ओबीसी, दलित आरक्षणाला धक्का लावयाचा काँग्रेसचा घाट; कोल्हापुरात मोदींचा घणाघात

बावनकुळे म्‍हणाले

  • १) शशिकांत शिंदेंबाबत पोलिसांना तक्रार मिळाली असून, त्यानुसारच गुन्हा दाखल केला आहे.

  • २) तक्रार दाखल झाल्यावर जनताही माफ करत नाही.

  • ३) निवडणुकीच्या काळातच नव्‍हे जेव्‍हाही तक्रार येते त्यानुसार कारवाई होते.

  • ४) जयंत पाटील यावेळेस ३२ ते ३५ जागा जिंकू असे म्‍हणत असले, तरी ते नेमके येत्या चार जूनला कळेल.

  • ५) माण, खटावच्या दुष्काळी भागासाठी मुख्‍यमंत्री, उपमुख्यमंत्री निर्णय घेऊन पाणी पोचविण्यासाठी प्रयत्‍नशील.

  • ६) यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांना जे ४० वर्षांत जमले नाही ते आम्‍ही पाच वर्षांत केले.

  • ७) माढ्यात कोणी कितीही जोर लावला, तरी जनतेला मोदींच्‍या नावाला मतदान करायचे आहे.

  • ८) मोदींची तुलना पुतीन यांच्‍याशी करण्‍यापेक्षा ‘कुठे मोदीजी, कुठे सूर्य, कुठे जयेंद्रथ, हे पाहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.