'या' निष्ठावंत शिलेदाराला खंबीर पाठबळ देण्यासाठी शरद पवार आज साताऱ्यात; मविआतर्फे जोरदार शक्तिप्रदर्शनाचे नियोजन

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना उमेदवारी देण्‍यात आली आहे.
Satara Lok Sabha Sharad Pawar
Satara Lok Sabha Sharad Pawaresakal
Updated on
Summary

पवारांचा शब्द प्रमाण मानून कोणत्याही निवडणुकीत उतरण्यास ते मागे-पुढे पाहात नाहीत. पक्षाच्या अडचणीच्या काळात ते नेहमी शरद पवारांसोबत भक्कमपणे उभे राहिले आहेत.

सातारा : राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला राहिलेल्या सातारा लोकसभा (Satara Lok Sabha) मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या आमदार शशिकांत शिंदे या निष्ठावंत शिलेदाराला खंबीर पाठबळ देण्यासाठी स्वत: शरद पवार (Sharad Pawar) आज साताऱ्यात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांसह महारॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करत आमदार शशिकांत शिंदे यांचा सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना उमेदवारी देण्‍यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे शिरवळ ते कऱ्हाड या मार्गावर ठिकठिकाणी जंगी स्वागत झाले. त्यानंतर त्यांनी मतदारसंघात प्रचारास धडाक्‍यात सुरुवात केली आहे. शिंदे हे पवारांचे निष्ठावान शिलेदार म्हणून ओळखले जातात.

Satara Lok Sabha Sharad Pawar
Hatkanangale Lok Sabha : आमदार आवाडेंची उमेदवारी अन् मानेंची झाली मोठी गोची; मत विभागणीचा धोका, सरुडकर 'सेफझोन'मध्ये

पवारांचा शब्द प्रमाण मानून कोणत्याही निवडणुकीत उतरण्यास ते मागे-पुढे पाहात नाहीत. पक्षाच्या अडचणीच्या काळात ते नेहमी शरद पवारांसोबत भक्कमपणे उभे राहिले आहेत. अशा निष्ठावान कार्यकर्त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्यासाठी तसेच आत्तापर्यंत नेहमी त्यांना साथ देणाऱ्या सातारा लोकसभा मतदारसंघातील जनतेला साद घालण्यासाठी शरद पवार उद्या साताऱ्यात येत आहेत.

Satara Lok Sabha Sharad Pawar
Sangli Lok Sabha : सांगलीत काँग्रेस नेत्यांसमोर धर्मसंकट; विशाल पाटलांच्या बंडाबाबत धोरण ठरवताना नेत्यांची होतेय कसरत

शरद पवार यांच्या या दौऱ्याचे महाविकास आघाडीच्‍या वतीने जोरदार नियोजन करण्‍यात आले आहे. पवार सकाळी साडेदहा वाजता हेलिकॉप्‍टरने सैनिक स्कूलच्या मैदानावर येणार आहेत. येथून ते वाहनाने गांधी मैदान येथे जाणार आहेत. तेथे पवार यांच्या उपस्थितीत शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्‍यासाठी महारॅलीस प्रारंभ होणार आहे. यावेळी त्‍यांच्‍यासोबत खासदार श्रीनिवास पाटील, आमदार पृथ्‍वीराज चव्‍हाण, बाळासाहेब पाटील यांच्‍यासह महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे वरिष्‍ठ नेते व पदाधिकारी उपस्‍थित राहणार आहेत.

शरद पवार स्वत: अर्ज भरण्यासाठी येणार असल्याने लाकड्या नेत्यांचा संदेश ऐकण्यासाठी जिल्ह्यातील विविध भागातील कार्यकर्ते व नागरिकही आज मोठ्या संख्येने साताऱ्यात येणार आहेत. गांधी मैदान येथून ही रॅली पोवई नाका येथे येणार आहे. तेथे सर्व मान्यवरांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍यासह विविध महापुरुषांना अभिवादन केले जाणार आहे. तेथून शशिकांत शिंदे उमेदवारी अर्ज भरण्‍यासाठी जाणार आहेत. त्यानंतर शरद पवार हे साताऱ्यातील प्रीती हॉटेलकडे जाणार आहेत. तेथे काही काळ थांबून ते मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर ते पुन्‍हा हेलिकॉप्‍टरने यवत येथील नियोजित कार्यक्रमासाठी रवाना होतील, असे सांगण्यात आले.

Satara Lok Sabha Sharad Pawar
Sangli Lok Sabha : ठरलं! सांगलीतून विशाल पाटील उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार; शिवसेनेसह मविआचं वाढवलं टेन्शन

शरद पवार यांचा दौरा

  • सकाळी साडेदहा वाजता हेलिकॉप्टरने सैनिक स्कूलच्या मैदानावर आगमन

  • वाहनाने गांधी मैदानावर जाणार

  • पवार यांच्या उपस्थितीत महारॅलीस प्रारंभ

  • पोवई नाक्यावरील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करणार

  • कार्यकर्त्यांसाठी वेळ राखीव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()