सातारा पुन्हा एकदा इतिहास घडवेल आणि शरद पवारांचा जिल्हा पुन्हा अबाधित राहील; शशिकांत शिंदेंना विश्वास

शरद पवार यांचा आदेश आल्यानंतर मी तत्काळ निवडणुकीत उतरलो आहे.
Mahavikas Aghadi candidate Shashikant Shinde
Mahavikas Aghadi candidate Shashikant Shindeesakal
Updated on
Summary

शाहू, फुले, आंबेडकर, तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांच्या या जिल्ह्याने पुरोगामी विचाराला प्राधान्य दिले आहे.

सातारा : माझ्यासमोर कोण उमेदवार आहे, तो मी पाहिलेला नाही. माझी त्यांच्याशी स्पर्धा नसून माझी लढाई तत्त्वाची आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आहे. जिल्ह्यातील जनतेला बदल हवा असून, या जनतेच्या ताकदीवर ही निवडणूक मी लढत आहे. खासदार शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांच्या माध्यमातून सातारा जिल्हा पुन्हा एकदा इतिहास घडवेल आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचा जिल्हा पुन्हा अबाधित राहील, असा विश्वास आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी व्यक्त केला.

Mahavikas Aghadi candidate Shashikant Shinde
'आताचे शाहू महाराज दत्तक आहेत, ते खरे वारसदार नाहीत'; मंडलिकांच्या वादग्रस्त वक्तव्याचे कोल्हापुरात तीव्र पडसाद

सातारा लोकसभेची (Satara Lok Sabha) उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचे आज जिल्ह्यात आगमन झाले. या वेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शशिकांत शिंदे म्हणाले, ‘‘शरद पवार यांचा आदेश आल्यानंतर मी तत्काळ निवडणुकीत उतरलो आहे. जिल्ह्यातील जनतेत मोठ्या प्रमाणात उठाव असून, जनतेच्या ताकदीवर ही निवडणूक लढत आहे. त्याचा परिणाम पाहायला मिळेल.

शाहू, फुले, आंबेडकर, तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांच्या या जिल्ह्याने पुरोगामी विचाराला प्राधान्य दिले आहे. या वेळी मला उमेदवारीची संधी मिळाली आहे. जिल्ह्यात प्रवेश करताना तरुण, सामान्य शेतकरी आणि सातारकरांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. लोकांच्या मनात जे काही आहे, त्यातून हा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

Mahavikas Aghadi candidate Shashikant Shinde
Satara Lok Sabha : सातारा आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला नाही; शिवेंद्रसिंहराजेंनी कोणाला दिलं आव्हान?

मला खात्री आहे, की महाविकास आघाडीच्या माध्यमातून राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून सातारा जिल्हा परत एकदा इतिहास घडवेल आणि शरद पवारांचा जिल्हा पुन्हा अबाधित राहील. उदयनराजेंना आव्हान देणार नाही आणि करणार नाही. जनतेच्या आणि लोकांच्या ताकदीवर निवडणुकीला सामोरे जाताना ही निवडणूक तत्त्वाच्या मुद्द्यातून पुढे घेऊन जाणार आहे.''

बॅकलॉग भरून काढणे हेच व्हीजन...

सर्वसामान्य जनता हीच माझी स्ट्रॅटेजी असून, जिल्ह्यातील लोकांना बदल हवा आहे, असे सांगून शिंदे म्हणाले, ‘‘तरुणांच्या बेरोजगारीचा, आयटीआय हब, स्थानिकांना रोजगार, सामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत, औद्योगिक क्षेत्राचा विकासाचा मुद्दा आहे. जिल्ह्याचा बॅकलॉग भरून काढणे हेच माझे व्हीजन असेल. विकास आणि जिल्ह्याचा स्वाभिमान पुन्हा उभा करण्याचा माझा प्रयत्न असेल.’’

Mahavikas Aghadi candidate Shashikant Shinde
Sangli Lok Sabha : सांगली काँग्रेसचा गड, मग मतदारसंघात RSS आमदार कसा होतो? संजय राऊतांचा थेट सवाल

मराठा समाजाची साथ मिळणार...

मराठा आरक्षणाचे वादळ तुमच्या पथ्यावर पडणार का? या प्रश्नावर शशिकांत शिंदे म्हणाले, ‘‘मी मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चावेळी मुंबईत केलेली मदत ही स्वकर्तव्य म्हणून केलेली आहे. यातून कोणतीही अपेक्षा नव्हती. केवळ मराठा समाजाचाच असंतोष नाही, तर धनगर समाजाचा प्रश्न आहे. ओबीसींचा मुद्दा आहे. सध्याच्या सरकारने त्यांना न्याय दिला नाही. उलट वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हे आता सर्वांना कळाले आहे. या सर्वांना एकत्र घेऊन मी पुढे जाणार आहे.’’

मदत करावी; पण दबाव नसेल...

माथाडीचे नेते नरेंद्र पाटील यांना साद घालणार का? या प्रश्‍नावर आमदार शिंदे म्हणाले, ‘‘पक्षाच्या माध्यमातून ते काम करत आहेत. त्यांनी माझा सत्कारही मुंबईत केला आहे. प्रत्येक जण विचार आणि तत्त्वातून चालत असतो. लोकशाहीच्या माध्यमातून वाटचाल करत राहतील. त्यांनी मला मदत करावी, हा निर्णय सर्वस्वी त्यांचा असेल. आम्ही त्यांच्यावर कोणताही दबाव टाकणार नाही.’’

Mahavikas Aghadi candidate Shashikant Shinde
लोकसभेच्या आखाड्यात संजय पाटलांना मिळणार पडळकरांची मोठी ताकद; जुना कडवा संघर्ष कार्यकर्ते विसरणार?

माथाडी कामगार ‘महाविकास’च्या मागे

शशिकांत शिंदे म्हणाले, ‘‘माथाडी कामगार आणि शरद पवार यांचे नाते आहे. त्यांनी माथाडींना घरे दिली. त्यांचे प्रश्न समजून घेतले. भाजपचे सरकार आल्यावर नवीन कायद्यांचे वटहुकूम निघाले आहेत. त्यामुळे माथाडी कामगार हे शरद पवार यांच्याशी बांधील आहेत. ते महाविकास आघाडीच्या मागे उभे राहतील.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()