Lok Sabha 2024 : शरद पवारांकडून महायुतीला तोडीस तोड उत्तर; पहिल्या टप्प्यातील राजकीय फेरजोडणीला आले यश

महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यात भाजपला यश आले. शरद पवारांच्या घरातच फूट पडल्यानंतर पवार थांबतील, अजित पवार यांना साथ देतील, अशी विरोधकांना अपेक्षा होती...
Sharad Pawar
Sharad PawareSakal
Updated on

स्वतः स्थापन केलेला पक्ष, चिन्ह आणि नावही पळवले. पक्षसंघटनेला सुरुंगही लावला, तरीही माघार घेतील ते शरद पवार कसले. जेवढे मोठे संकट, तेवढी मोठी संधी समजून वयाच्या ८३ व्या वर्षी पायाला भिंगरी बांधून पवार पुन्हा एकदा पक्षाच्या फेरबांधणीलाही लागले आहेत. आघाडीच्या राजकारणात त्यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वाट्याला आलेल्या १० मतदारसंघांत एकास एक उमेदवार देत, पहिल्या टप्प्यात कसलेल्या वस्तादाचा डाव टाकण्यात श्री. पवार यशस्वी झाले आहेत.

महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यात भाजपला यश आले. शरद पवारांच्या घरातच फूट पडल्यानंतर पवार थांबतील, अजित पवार यांना साथ देतील, अशी विरोधकांना अपेक्षा होती. तरीही पवार थांबत नसल्याने त्यांचा पक्ष आणि चिन्हावर दावा केला. अपेक्षेप्रमाणे निवडणूक आयोगानेही संस्थापक असलेल्या पवारांचा पक्ष अजित पवार यांना बहाल केला. तरीही पवार यांनी हार मानली नाही. तर उलट मोठ्या ताकतीने आणि उत्साहाने ते कामाला लागले आहेत.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शरद पवार गटाला १० मतदारसंघ मिळाले आहेत. मात्र पक्षात झालेली फाटाफूट, नेते मंडळींनी अजित पवारांना दिलेली साथ यामुळे पवार यांना उमेदवार मिळणार नाहीत, अशी चर्चा विरोधक करत होते. मात्र पवार यांनी वाट्याला आलेल्या मतदार संघात तोडीस तोड उमेदवार देऊन विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे.

Sharad Pawar
Lok Sabha : प्रचारसभेसाठी लागणारे मंडप भाडे किती ? निवडणूक खर्चावर आयोगाची करडी नजर

राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वाधिक चुरशीची निवडणूक बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी जुने मित्र आणि पारंपरिक विरोधक तसेच सर्वसामान्य मतदारांनाच साद घातली आहे. बारामतीतून सुळे यांच्यासाठी जोडणी लावत असतानाच शिरूरमध्ये डॉ. अमोल कोल्हे आणि साताऱ्यात आ. शशिकांत शिंदे यांच्यासाठीही ते जोडण्या लावत फिरत आहेत.

वर्षानुवर्षे काँग्रेसकडे असलेल्या वर्धा मतदार संघात मागील दोन निवडणुकीत भाजपने रामदास तडस यांच्या माध्यमातून विजय मिळवला आहे. मात्र यावेळी काँग्रेसचे आमदार अमर काळे यांना शरद पवारांनी राष्ट्रवादीतून उमेदवारी देत नवी खेळी खेळली आहे. काळे हे राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचे भाचे आहेत.

खानदेशातील रावेरमधून उद्योजक श्रीराम पाटील यांना श्री. पवार यांनी उमेदवारी दिली आहे. श्री. पाटील हे उद्योजक असून राजकारणातील नवखा चेहरा आहेत. अहमदनगर दक्षिण मधून कोरोना काळात आरोग्य सेवा केलेले निलेश लंके यांना राष्ट्रवादीने उमेदवारी देत भाजप उमेदवारासमोर आव्हान निर्माण केले आहे. भिवंडीच्या ग्रामीण भागातील लोकप्रिय नेते सुरेश म्हात्रे यांच्या उमेदवारीनेही चुरस निर्माण करण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे.

Sharad Pawar
Lok Sabha Election : बारामती लोकसभेमध्ये शरद पवार नावाच्या रिक्षाचालकाला उमेदवारी, बघतोय रिक्षावाला संघटनेने उभे केले गिग वर्कर्स

‘माकप’चा मविआला पाठिंबा

राज्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केवळ दिंडोरी येथील उमेदवारी देण्याची मागणी केली होती. पक्षाचे नेते माजी आमदार जे. पी. गावित यांनी तर प्रचारही सुरू केला होता. मात्र पक्षाने महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पवार यांच्या पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे यांना माकपची चांगली मदत होणार आहे. तर माकपने आघाडीला पाठिंबा दिल्याने महायुतीचे टेन्शन वाढले आहे.

जानकरांना नेले, मोहिते पाटलांना आणले

शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भाजपने जानकर यांना पुन्हा महायुतीत घेत पवारांना धक्का दिला. असे असले तरी भाजप नेत्यांचा आणि महायुतीचा हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण माढ्यातून पवार यांनी थेट मोहिते पाटील यांचाच हुकमी एक्का काढला आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांना राष्ट्रवादीकडून माढा येथून उमेदवारी दिल्याने महायुतीच्या नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()