सांगली लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा शिवसेनेला संपूर्ण पाठिंबा आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
सांगली : सांगली (Sangli Lok Sabha) हा जर काँग्रेसचा (Congress) गड असेल, तर खुद्द सांगली विधानसभा मतदारसंघात संघाचा माणूस आमदार कसा होतो? मिरजेत भाजप (BJP) कशी जिंकते? दहा वर्षे भाजपचा खासदार कसा निवडून येतो, असा सवाल करत शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आता सांगली जिंकायची असेल तर शिवसेनाच हवी, अशी भूमिका मांडली.
सांगलीत काँग्रेसने नाराजी दाखवली, तर शिवसेना कोल्हापुरात नाराजी दाखवेल, असा इशारादेखील राऊत यांनी दिला आहे. विशाल पाटील यांनी २०१९ मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवली होती. ती चूक त्यांना कळली आहे. यावेळी पुन्हा तशी चूक ते करणार नाहीत, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.
संजय राऊत म्हणाले, ‘विश्वजित किंवा विशाल पाटील यांच्या भावना आम्ही समजून घेतो. ते काँग्रेसचे जुनेजाणते कार्यकर्ते आहेत. अनेक वर्षे काँग्रेसचे काम करत आहेत. गेल्या काही वर्षांत सांगलीत जातीयवादी शक्तींना स्थान मिळाले आहे. प्रत्यक्ष सांगलीत संघाचा माणूस निवडून येतो. मिरजेत दंगली घडवल्या जातात, तेथेही संघाचा माणूस निवडून येतो. विशाल, विश्वजित यांना हे माहिती आहे.
भाजपचे खासदार १० वर्षे निवडून येत आहेत. त्यांच्याशी टक्कर घ्यायची असेल, तर तेथे शिवसेनेचा उमेदवार लढला पाहिजे, ही जनभावना आहे. तेथे काँग्रेस परंपरेने काम करत आहे. वसंतदादा पाटील यांच्यासह अनेक नेत्यांचा प्रभाव आहे; परंतु आज या शक्तींशी मुकाबला करायला शिवसेना हवी, ही गरज आहे. त्यासाठी चंद्रहार पाटील उमेदवार आहेत. शिवसेना ताकदीने तेथे उभी आहे.’
सांगली लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा शिवसेनेला संपूर्ण पाठिंबा आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. ते म्हणाले, ‘माझे जयंत पाटील यांच्याशी बोलणे झाले आहे. राष्ट्रवादी आमच्या पाठीशी ठामपणे आहे. पवारसाहेबांनीही तसे सांगितले आहे.’
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.