Shrikant Shinde on Ganpat Gaikwad: उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदेंचा गणपत गायकवाडांवर हल्लाबोल; म्हणाले, गुंड प्रवृत्ती...

फडणवीसांनी वैयक्तिकरित्या माध्यमांशी बोलताना त्यांच्या नावाची घोषणा केली, पण अद्याप त्यांची अधिकृत घोषणा झालेली नाही.
Shrikant Shinde
Shrikant Shinde
Updated on

मुंबई : खासदार श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिकरित्या माध्यमांशी बोलताना त्यांच्या नावाची घोषणा केली.

अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी तरी फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितल्यानं त्यावर शिक्कामोर्तबच झालं आहे. पण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी थेट गणपत गायकवाड यांच्यावर हल्लाबोल केला आहे. (Shrikant Shinde on Ganpat Gaikwad after announcement of his candidature from Kalyan Loksabah Election)

Shrikant Shinde
Rohit Pawar : शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं हे मुख्यमंत्र्यांनी अजितदादांना विचारावं; रोहित पवारांचा टोला

श्रीकांत शिंदे म्हणाले, कल्याण लोकसभेचा विषय पहिल्यापासूनच क्लिअर होता. माझं नाव एकनाथ शिंदेंनी बाकीच्या खासदारांसमोर जाहीर करण्यासाठी ठेवलं असेल. ऑलरेडी आम्ही युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये बैठका झाल्या आहेत. मंत्री रविंद्र चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष किंवा शहराध्यक्ष लोकसभा प्रमुख, आमचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अशी सर्वांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. (Latest Marathi News)

Shrikant Shinde
Rohit Pawar and Crab: 'त्या' खेकड्याचं नेमकं काय केलं? रोहित पवारांनी स्पष्टीकरण देताना भाजपला धरलं धारेवर

फडणवीसांनी माझी उमेदवारी जाहीर केल्यानं मी त्यांचं स्वागत करतो. यावेळी कल्याण लोकसभेतून मोठ्या मताधक्यानं ही जागा निवडून येईल. भाजपचे नेते गणपत गायकवाड यांनी श्रीकांत शिंदेंसाठी आपण काम करणार नाही, असा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडं पाठवला होता. त्यावर आता देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, त्यामुळं त्यावर जास्त बोलणं योग्य नाही. पण ज्यांचा (गणपत गायकवाड) पर्सनल अजेंडा असेल तर तो त्यांनी वैयक्तिक राबवला पाहिजे पक्षाचं नाव घेऊ नाही. (Latest Marathi News)

Shrikant Shinde
Shrikant Shinde: कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंना उमेदवारी मिळणार की नाही? फडणवीसांनी अखेर स्पष्टच सांगितलं

पक्षाचं नाव घेऊन युतीचं नाव खराब करण्याचं काम त्यांनी करु नये. गुंड प्रवृत्तीचे लोक असं वागत असतील तर ते योग्य नाही. हे असं का वागत आहेत? मतदारसंघाचा विकास केलेला नाही का? तर झालेला आहे. राज्य सरकार किंवा केंद्राचा अजेंडा हे खराब करत आहेत. त्यांच्या विधानाला गोळीबाराची पार्श्वभूमी आहे, त्यांनी स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केलेला आहे.

निवडणुकीच्या काळात जर त्यांना यातून काही साध्य करायचं असेल तर ते त्यांनी विसरुन जावं, त्यांच्या चुकीचं समर्थन भाजपनंही केलेलं नाही. उलट युतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. प्रत्येक जागेसाठी इथं युतीतील नेते तळमळीनं काम करत आहेत, असंही यावेळी श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.