डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी अशी रंगतदार लढत पहायला मिळाली आहे. राज्यात पक्षफुटीनंतर यंदाच्या लोकसभेत शिवसेना शिंदे गट व ठाकरे गट अशी लढत होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी चक्क त्यांचे राजकीय कडवे विरोधक आज त्यांच्याच प्रचारासाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून मतदारसंघ पिंजून काढत आहेत. यावेळी फिरताना 2014 च्या लोकसभेची आठवण आल्याचे खासदार शिंदे यांनी आवर्जून सांगितले.
कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा प्रचार मतदारसंघात सुरू आहे. मनसेचे आमदार राजू पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते व माजी आमदार आनंद परांजपे हे देखील श्रीकांत यांच्या खांद्याला खांदा लावून मतदारसंघात फिरत आहेत. रॅलीत एकाच रथावर पूर्वीचे कट्टर राजकीय विरोधक एकत्र पाहून सामान्य नागरिक चर्चा करत आहेत. एवढेच नाही तर उमेदवार खासदार यांच्यासह खुद्द आमदार, माजी आमदारांना देखील याचे वेगळे अनुभव येत आहेत. यावर खासदार, आमदार, माजी आमदार यांच्या चर्चा देखील रंगत आहे.
याविषयी उमेदवार खासदार डॉ. शिंदे म्हणाले, वेळ बदलत असतो. वेळेनुसार आपण चालत असतो. प्रचार यात्रेमध्ये आम्ही एकत्र असतो. मी पहातो मी मध्ये, बाजूला राजू पाटील, आनंद परांजपे होते. या दोघांचे देखील या मतदारसंघांमध्ये योगदान आहे. त्यांचे मी आभार देखील व्यक्त करतो. ते माझ्या प्रचारासाठी आले ते स्वतः त्या रथावरती होते.
आणि पूर्ण ग्राउंड लेव्हल वरती त्यांचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील ते स्वतः काम करत आहेत. 2014 ची आठवण आली. आमची चर्चा देखील झाली. एक दुसऱ्यांच्या समोर आम्ही लढत होतो. आज 2024 ला काळ बदलला, वेळ बदलली आणि आम्ही एकत्र प्रचार करत आहोत असे खासदार शिंदे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.