नागपूर : कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराची अद्याप महायुतीकडून घोषणा झालेली नाही. त्यामुळं विद्यमान खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला होता. पण आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्टच सांगितलं आहे. (Shrikant Shinde will be candidate of mahayuti in kalyan lok sabha constituency Devendra Fadnavis announced)
नागपूर इथं भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस म्हणाले, "श्रीकांत शिंदे यांना भाजपकडून विरोध नाही. ते कल्याणमधून शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत, ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत. भाजप त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहणार आहे. पूर्ण ताकदीनं आणि मागच्यावेळपेक्षा जास्त मतांनी श्रीकांत शिंदे यांना आम्ही सर्वजण आमची बृहद युती निवडून आणेल" (Latest Marathi News)
त्यामुळं आता कल्याणमधून श्रीकांत शिंदे हेच लोकसभेचे महायुतीचे उमेदवार असतील याची आता घोषणा झाली आहे. त्यामुळं या मतदारसंघात आता शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर राणे यांच्यात सामना पहायला मिळणार आहे. (Marathi Tajya Batmya)
दरम्यान, शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी देखील यावरुन आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी म्हटलं होतं की, "जर कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी मिळाली नाहीतर मी राजकारण सोडेन" त्यानंतर आता यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.