किस्से निवडणुकीचे : ‘हे’ पक्षाचे सदस्य आहेत का?

निवडणुकीच्या काळात टोमणेबाजी हा आपल्या प्रचार मोहिमांचा अविभाज्य भाग आहे. एरवी संयत भाषण करणारे नेतेही वातावरण तापले की विरोधकांची खिल्ली उडविताना मागे-पुढे पाहात नाहीत.
jyoti basu lal krishna advani
jyoti basu lal krishna advanisakal
Updated on

निवडणुकीच्या काळात टोमणेबाजी हा आपल्या प्रचार मोहिमांचा अविभाज्य भाग आहे. एरवी संयत भाषण करणारे नेतेही वातावरण तापले की विरोधकांची खिल्ली उडविताना मागे-पुढे पाहात नाहीत. त्यातच आपापल्या विचारधारेशी एकनिष्ठ असलेल्या नेत्यांदरम्यान टीका असले तर त्या टीकेला कधी खुसखुशीतपणा असतो, तर कधी चांगलीच धार असते. हे किस्से बराच काळ लोकांच्या लक्षातही राहतात.

ही १९९१ च्या निवडणुकीवेळी भाजपचे आधारस्तंभ लालकृष्ण अडवानी आणि माकपचे दिग्गज नेते ज्योती बसू यांनी एकमेकांना मारलेले टोमणे अद्यापही बंगालमध्ये अनेकांच्या लक्षात आहेत. ‘मंदिर वही बनाएंगे’ची घोषणा करत विश्‍व हिंदू परिषद आणि भाजपने राजकीय-सामाजिक वातावरण ढवळून काढले होते.

देशाच्या राजकारणात पूर्वी कधी नव्हे इतक्या प्रमाणात धार्मिक ध्रुवीकरण होत होते. अडवानींनी काढलेल्या रथयात्रेमुळे ते ‘हिंदुत्ववादा’चा चेहरा बनले होते. ‘धर्म ही अफूची गोळी आहे,’ असे मानणाऱ्या डाव्यांना या बदलाचा तिटकारा वाटत होता. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने डाव्यांनी उजव्या विचारसरणीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडण्याची संधी साधली.

jyoti basu lal krishna advani
Loksabha Election 2024 : भाजपला खात्री, तर कॉँग्रेसला बदलाची आशा ; पंतप्रधान नरेंद्र मोदींसह प्रमुख नेत्यांच्या होणार सभा

बंगाल एका सभेत बोलताना त्यावेळी मुख्यमंत्री असलेले ज्योती बसू यांनी भाजपवर टीकेचा हातोडा मारताना देशभरात जातीयवादी वातावरण तयार करत असल्याचा आरोप केला होता. अडवानींच्या प्रचाररथावर त्यावेळी श्रीरामाचे मोठे चित्र लावलेले असे. कट्टर मार्क्सवादी असलेल्या ज्योतिबाबूंनी त्यावर जोरदार आक्षेप घेतला.

‘अडवानींच्या रथावर रामाचे चित्र लावण्याची गरज काय? राम हा काही भाजपचा सदस्य आहे का?’, असा सवाल त्यांनी सभेत विचारला. अडवानीही काही गप्प बसणारे नव्हते. त्यांनी त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. त्यावेळी माकपच्या बैठकांमध्ये भिंतींवर मार्क्स आणि एंजल्स या क्रांतिकारी नेत्यांची मोठाली छायाचित्रे लावलेली असत.

त्याकडे लक्ष वेधताना अडवानींनी पुढच्याच सभेत, ‘हे दोघे माकपचे नेते आहेत का?’ असा सवाल विचारत ज्योतिबाबूंना तोडीस तोड उत्तर दिले होते. निवडणूक काळातच राजीव गांधी यांची हत्या झाल्याने जनतेने काँग्रेसला केंद्रात सत्तेवर बसवले. मात्र, भाजपला शंभराच्यावर जागा मिळाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.