Kolhapur Lok Sabha Bharat Gogawale
Kolhapur Lok Sabha Bharat Gogawaleesakal

'छत्रपती शिवरायांनंतर दुसरे कोणी छत्रपती होऊ शकत नाहीत'; कोणाला उद्देशून म्हणाले आमदार गोगावले?

आपल्या नावासमोर छत्रपती लावले म्हणून शिवरायांचे गुण अंगी येणार नाहीत.
Published on
Summary

'पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे काम करूया व प्रा. संजय मंडलिक यांना मताधिक्य देवूया.’

चंदगड : ‘आपल्या नावासमोर छत्रपती लावले म्हणून शिवरायांचे गुण अंगी येणार नाहीत. ज्ञानेश्वर माउलींनंतर कोणीही समाधी घेणारे नाहीत, तुकोबारायांनंतर कोणीही वैकुंठाला गेले नाही. तसे छत्रपती शिवरायानंतर दुसरे कोणी छत्रपती होऊ शकत नाहीत, हे ध्यानात असू द्या,’ अशी टीका आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी केली.

Kolhapur Lok Sabha Bharat Gogawale
Hatkanangale Lok Sabha : आमदार आवाडेंची उमेदवारी अन् मानेंची झाली मोठी गोची; मत विभागणीचा धोका, सरुडकर 'सेफझोन'मध्ये

ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथे शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Lok Sabha) मतदारसंघ निरीक्षक शरद कणसे अध्यक्षस्थानी होते. गोगावले म्हणाले, ‘सर्वसामान्य जनतेच्या उन्नतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्रंदिवस कार्यतत्पर आहेत. त्यांच्या निष्ठेखातर व पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे काम करूया व प्रा. संजय मंडलिक यांना मताधिक्य देवूया.’

Kolhapur Lok Sabha Bharat Gogawale
खासदार मंडलिक, महाडिकांना 'ती' वक्तव्ये पडली महागात! 'मविआ'ने निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली तक्रार

महिला आघाडी जिल्हा उपप्रमुख संगीता पाटील यांनी स्वागत केले. दिवाकर पाटील यांनी तालुक्यातील शिवसेनेच्या कार्याचा आढावा घेतला. पक्षाचा खासदार असताना सुद्धा कार्यकर्त्यांची कामे झाली नाहीत, अशी खंत व्यक्त केली. सरपंच सुष्मिता पाटील, मंगला तिबिले यांनी मनोगत व्यक्त केले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()