Kolhapur Lok Sabha Hasan Mushrif
Kolhapur Lok Sabha Hasan Mushrifesakal

Kolhapur Lok Sabha : मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मंडलिकांना विजयी करायचंय; काय म्हणाले मुश्रीफ?

'कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघाचे मताधिक्य हे मंडलिक यांना विजयाप्रत नेणारे ठरेल.'
Published on
Summary

'मंडलिक आणि मुश्रीफ ही दोन नावे वेगवेगळी होऊच शकत नाहीत. आम्ही अनेक वर्षे एकत्र काढली आहेत. दुर्दैवाने काही मतभेदही झाले.'

कागल : ‘प्रा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांना खासदार करून कागल तालुक्याचा सन्मान आणि स्वाभिमान जपूया. त्यांच्या मोठ्या मताधिक्याच्या विजयाच्या रूपाने लोकनेते दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांना वंदन करूया’, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केले.

येथील शाहू हॉलमध्ये कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील होते. मुश्रीफ म्हणाले, ‘कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघाचे मताधिक्य हे मंडलिक यांना विजयाप्रत नेणारे ठरेल. नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधान झाल्यानंतर देशाने प्रगती केली आहे. मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मंडलिक यांना विजयी करायचे आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी हेवेदावे सोडून एकदिलाने काम करावे.’

Kolhapur Lok Sabha Hasan Mushrif
Kolhapur Lok Sabha : 'कौन है यह मुन्ना, कहाँसे आया..' शरद पवारांच्या एका वाक्यावरच फिरली 2004 ची निवडणूक

यावेळी मुश्रीफ यांनी शेरोशायरीही केली. प्रा. मंडलिक म्हणाले, ‘कागल तालुक्यात विकासाचे राजकारण करण्यासाठी स्पर्धा असते. पालकमंत्री मुश्रीफ यांच्यासह खासदार धनंजय महाडिक व महायुतीच्या सर्वच नेत्यांनी माझ्या उमेदवारासाठी प्रयत्न केले, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पालकमंत्री मुश्रीफ, समरजितसिंह घाटगे व मी विकासासाठी एकत्र आलो आहोत. जिल्ह्याच्या विकासासाठी ८०० कोटी रुपयांचा निधी माझ्या माध्यमातून दिला आहे.’

Kolhapur Lok Sabha Hasan Mushrif
Sangli Loksabha: सांगलीत शिवसेना जिंकली, हरली पण वाढली नाही; 'मातोश्री'वरूनही मिळालं नाही बळ?

यावेळी ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील, शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, वसंतराव धुरे, शशिकांत खोत, प्रवीणसिंह भोसले, प्रा. सिद्धार्थ बन्ने, आदींची भाषणे झाली. राष्ट्रवादीचे जिल्हा युवक अध्यक्ष नितीन दिंडे यांनी स्वागत केले. कागल तालुकाध्यक्ष विकास पाटील-कुरुकलीकर यांनी प्रास्ताविक केले. विशाल बेलवलेकर यांनी सूत्रसंचालन केले. तर शहराध्यक्ष संजय चितारी यांनी आभार मानले.

Kolhapur Lok Sabha Hasan Mushrif
Satara Lok Sabha : साताऱ्याच्या उमेदवारीचं घोडं अडलं कशात? मविआ-महायुतीकडून अद्याप उमेदवारी जाहीर नाहीच!

मंडलिक- मुश्रीफ एकच...!

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘मंडलिक आणि मुश्रीफ ही दोन नावे वेगवेगळी होऊच शकत नाहीत. आम्ही अनेक वर्षे एकत्र काढली आहेत. दुर्दैवाने काही मतभेदही झाले; परंतु मनातील आत्मीयता आणि जिव्हाळा कधीच कमी झाला नाही.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.