Sanjay Mandlik Dhananjay Mahadik
Sanjay Mandlik Dhananjay Mahadikesakal

Kolhapur Loksabha : संजय मंडलिकांच्या भविष्याची मुख्यमंत्रीच काळजी घेतील; असं का म्हणाले धनंजय महाडिक?

‘आमदार सतेज पाटील नेहमीच ज्योतिषी भविष्य सांगत आलेले आहेत. त्यातले त्यांना थोडे ज्ञान आहे.'
Published on
Summary

कोल्हापुरात महायुतीचा उमेदवार साडेतीन लाखांनी निवडून येणार हे चित्र स्पष्ट आहे. म्हणून दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवत आहेत.

कोल्हापूर : ‘खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) हे संयमाने काम करतात. त्यांना लोकसभेसाठी थांबविले तर त्यांच्या भविष्याची काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नक्कीच घेतील, त्यांना समजावतील’, अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघात माध्यमांशी बोलताना दिली. त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार कोण, या विषयाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे.

Sanjay Mandlik Dhananjay Mahadik
Kolhapur Loksabha : कोल्हापूर, हातकणंगलेच्या जागांबाबत तिढा कायम; महायुतीकडून मंडलिक, घाटगे, महाडिकांचं नाव चर्चेत

खासदार मंडलिकांसाठी काल कार्यकर्त्यांचा मेळावा झाला, यावर खासदार महाडिक (Dhananjay Mahadik) म्हणाले, ‘लोकसभेच्या उमेदवारांसाठी महाराष्ट्रामधील अनेक जागांचे वाटप अजून जाहीर झालेले नाही. कोल्हापूरबाबत फक्त माध्यमातून बातम्या येत आहेत. मंडलिकांची उमेदवारी जाहीर होण्यास दिरंगाई होत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मेळावा घेतला असेल. खासदार संजय मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांची तशी भावना असणे स्वाभाविक आहे. दोन दिवसांत उमेदवारी जाहीर होईल. आज मेळावा होत असला तरी ते संयमाने पुढे जातील.’

Sanjay Mandlik Dhananjay Mahadik
Satej Patil : महायुतीचे उमेदवार ठरू देत, मग फासे कसे पडतील याची माहिती नाही; सतेज पाटलांचा नेमका कोणाला इशारा?

ते पुढे म्हणाले, ‘आमदार सतेज पाटील नेहमीच ज्योतिषी भविष्य सांगत आलेले आहेत. त्यातले त्यांना थोडे ज्ञान आहे. त्यांना निवडणूक लढवा म्हणून सांगणारा मी कोण? त्यांनी जे षड्‍यंत्र रचले ते आता जनतेसमोर आले आहे. महायुतीचा उमेदवार साडेतीन लाखांनी निवडून येणार हे चित्र स्पष्ट आहे. म्हणून दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवत आहेत.

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात विरोधकांनी राजकारण केले आहे. आमच्या लोकांना कोणतेही लाभ मिळालेले नाहीत. आता आम्ही सत्तेत आहोत. कोणताही गट-तट न पाहता लाभ होईल, असे मी त्यांना आश्वस्थ केले आहे. गेल्या वेळी निवडून दिलेल्या सदस्यांचा संपर्क पाहता विधानसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार एक लाख मतांच्या फरकाने निवडून येईल.’

Sanjay Mandlik Dhananjay Mahadik
'लोकसभेसाठी कऱ्हाड तालुक्यातून 500 उमेदवार देणार'; नेत्यांना धडा शिकवण्यासाठी मराठा समाजाचा निर्णय

भाजप म्हणून मागणी केली नाही...

‘भाजप म्हणून आम्ही कोणतीही मागणी केलेली नाही. जागा बदल झाला तर आम्ही ताकदीने निवडणूक लढू. जागा कोणालाही गेली तरी कोल्हापूरच्या दोन्ही जागा ताकदीने निवडून आणू. मात्र, सर्व निर्णय दिल्लीतून होईल,’ असे खासदार महाडिक म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()