Sharad Pawar vs Sanjay Mandlik
Sharad Pawar vs Sanjay Mandlikesakal

Kolhapur Loksabha : 'जुना राग काढण्याचा पवारांचा डाव, म्हणूनच शाहू महाराजांना उमेदवारी दिली'; मंडलिकांचा आरोप

शाहू महाराज यांची निवडणुकीची इच्छा होती का नाही हे मला माहिती नाही.
Published on
Summary

आमदार प्रकाश आबिटकर ठाकरे गटाकडे परत येणार असल्याचा गौप्यस्फोट ॲड. आसिम सरोदे यांनी केला, त्यावर प्रा. मंडलिक म्हणाले, ‘सरोदे हे ज्योतिषी आहेत का?

कोल्हापूर : ‘यापूर्वीच्या निवडणुकीतील जुना राग काढण्याचा खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांचा डाव आहे. त्यातूनच त्यांनी शाहू महाराज (Shahu Maharaj) यांना माझ्याविरोधात रिंगणात उतवरण्याचे षड्‌यंत्र केल्याचा आरोप खासदार संजय मंडलिक यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

खासदार मंडलिक (Sanjay Mandlik) म्हणाले, ‘पवार हे देशाचे मोठे नेते आहेत. त्या काळात त्यांच्या विरोधात दिवंगत सदाशिवराव मंडलिक (Sadashivarao Mandalik) होते. तेवढा मोठा मी नाही. शाहू महाराज यांची निवडणुकीची इच्छा होती का नाही हे मला माहिती नाही; पण पवार यांना जुना कोणता तरी राग काढायचा असेल का याबाबत कल्पना नाही. जर रागच काढायचा असेल तर जनता दाखवून देईल.’

Sharad Pawar vs Sanjay Mandlik
रिलस्टार धनंजय पोवार 'या' मतदारसंघातून लढवणार निवडणूक? शरद पवारांची घेतली भेट, डीपींना पवारांनी दिला 'हा' सल्ला

‘आज दुपारपर्यंत महायुतीच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. उमेदवार म्हणून मी रिंगणात उतरणार आहे. निवडणुकीची तयारी म्हणून माझ्या कार्यकर्त्यांनी काल मेळावा घेतला. माझ्या उमेदवाराची घोषणा झाल्यानंतर कार्यकर्ते कामाला लागतील. माझी उमेदवारी घोषित नसल्याने मी कालच्या मेळाव्याला उपस्थित नव्हतो. उमेदवारी घोषित झाल्यानंतर महायुतीतील सर्व नेत्यांना घेऊन मी मेळावा घेणार असल्याचे मंडलिक यांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar vs Sanjay Mandlik
Kolhapur Loksabha : शिव-शाहूंच्या विचारधारेने महाराज काम करताहेत, लोकसभेला त्यांना बळ द्या; संभाजीराजेंचं आवाहन

महायुतीच्या उमेदवाराबाबत कोल्हापुरात अजूनही संभ्रम आहे. त्यावर बोलताना मंडलिक म्हणाले, ‘युतीतल्या प्रत्येक पक्षाला वाटते की माझ्या विचाराचा माणूस या शाहूंच्या भूमीतून निवडून यावा. जर उमेदवारीवरून वावड्या उठल्या तरी मी गैर समजत नाही. निवडणुकीच्या काळात हे होतच असते. खासबाग मैदानात एखाद्या मल्लाची कुस्ती असेल तर त्या मल्लाला सराव देण्यासाठी तालमीतील सर्व मल्ल आखाड्यात उतरत असतात. त्याच पद्धतीने या वावड्या म्हणजे सरावाच्या कुस्त्या आहेत.’

‘मागील निवडणुकीत ते माझ्या स्टेजवर होते. या निवडणुकीला ते माझ्या स्टेजवर येतील असे मी का म्हणू नये?,’ असा प्रश्‍न मंडलिक यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना उपस्थित केला. ‘ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी आहे. व्यक्तिगत हेव्यादाव्यांवर ही निवडणूक घेऊन जाऊ नये’, असे आवाहनही त्यांनी केले.

Sharad Pawar vs Sanjay Mandlik
Kolhapur Loksabha 1967 : शेकापच्या उमदेवाराचा पराभव करून स्वातंत्र्यसैनिक शंकरराव माने झाले कोल्हापूरचे खासदार

सरोदे ज्योतिषी आहेत का?

आमदार प्रकाश आबिटकर ठाकरे गटाकडे परत येणार असल्याचा गौप्यस्फोट ॲड. आसिम सरोदे यांनी केला, त्यावर प्रा. मंडलिक म्हणाले,‘सरोदे हे ज्योतिषी आहेत का? आबिटकर हे विकासासाठी झटणारे आमदार आहेत. माझ्या उमेदवारीसाठी ते प्रयत्न करणाऱ्यांपैकी एक आहेत. ते निश्चितच आमच्या सोबत असतील ते दुसरीकडे जाण्याचा विचार करणार नाहीत.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()