Shahu Chhatrapati Maharaj
Shahu Chhatrapati Maharajesakal

Kolhapur Loksabha : तब्बल 25 वर्षांनंतर कोल्हापुरात दिसणार 'हात'; शाहू महाराजांच्या उमेदवारीने मिळाली प्रतिष्ठा

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहता १९७७ चा अपवाद वगळता १९९८ पर्यंत काँग्रेसचे या मतदारसंघावर वर्चस्व होते.
Published on
Summary

२०१४ च्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांनी आताचे शिवसेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांचा पराभव केला.

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची (Kolhapur Loksabha Elections) जागा महाविकास आघाडीत काँग्रेसला (Congress) मिळाल्याने या मतदारसंघात तब्बल २६ वर्षांनी ‘हात’ हे चिन्ह दिसणार आहे. त्यात श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांच्या उमेदवारीने पक्षासह चिन्हालाही प्रतिष्ठा मिळाली आहे.

Shahu Chhatrapati Maharaj
Kolhapur LokSabha : पहिल्याच निवडणुकीत सदाशिवराव मंडलिकांनी 61 हजारांच्या फरकानं घाटगेंवर मिळवला विजय!

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहता १९७७ चा अपवाद वगळता १९९८ पर्यंत काँग्रेसचे या मतदारसंघावर वर्चस्व होते. १९९९ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी दोन्ही खासदार हे काँग्रेसचे होते, त्यापैकी तत्कालिन खासदार कै. सदाशिवराव मंडलिक (Sadashivarao Mandalik) यांनी श्री. पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला, तर कल्लाप्पा आवाडे हे काँग्रेससोबतच राहिले; पण श्री. आवाडे यांच्या विरोधात दोन वेळा लढलेल्या श्रीमती निवेदिता माने यांनीही श्री. पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला.

Shahu Chhatrapati Maharaj
Kolhapur Loksabha : शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारासह विजयी सभेलाही कोल्हापुरात येणार; उद्धव ठाकरेंची ग्वाही

त्यातून १९९९ ची लोकसभा निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादीनेही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसने कोल्हापुरातून त्यावेळचे माजी खासदार आणि या मतदारसंघाचे सलग २५ वर्षे प्रतिनिधित्व केलेले कै. उदयसिंगराव गायकवाड यांना रिंगणात उतरले; पण त्यांचा तब्बल एक लाख आठ हजार मतांनी पराभव करून कै. मंडलिक खासदार झाले. या जोरावर २००४ च्या निवडणुकीत आघाडीत ही जागा राष्ट्रवादीकडे गेली.

तेव्हापासून २०१९ च्या निवडणुकीत या जागेवर राष्ट्रवादीचाच हक्क राहिला; पण २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे संभाजीराजे छत्रपती कै. मंडलिक यांच्याकडून पराभूत झाले, तर २०१४ च्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांनी आताचे शिवसेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांचा पराभव केला.

Shahu Chhatrapati Maharaj
Satara LokSabha : सातारा जातीयवादी विचाराकडे कधीही जाऊ देणार नाही; काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

२०१९ मध्येही जागा राष्ट्रवादीकडेच आणि महाडिक हे उमेदवार होते; पण त्यांचा पराभव झाला. आता महाविकास आघाडीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र आले आहेत. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी हा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचून आणला आहे. त्यामुळे या मतदारसंघात १९९९ नंतर पहिल्यांदाच पक्षाचे ‘हात’ हे चिन्ह ईव्हीएम मशीनवर दिसणार आहे.

दृष्टिक्षेपात कोल्हापूरचे खासदार

  • १९७१ राजाराम निंबाळकर काँग्रेस

  • १९७७ दाजीबा देसाई शेतकरी कामगार पक्ष

  • १९८० ते १९९८ उदयसिंगराव गायकवाड काँग्रेस

  • १९९८ कै. सदाशिवराव मंडलिक काँग्रेस

  • १९९९ ते २००४ कै. सदाशिवराव मंडलिक राष्ट्रवादी काँग्रेस

  • २००९ कै. सदाशिवराव मंडलिक अपक्ष

  • २०१४ खासदार धनंजय महाडिक राष्ट्रवादी काँग्रेस

  • २०१९ खासदार प्रा. संजय मंडलिक शिवसेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.